भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी वानखेडेंच्या बैठका…; राऊतांचा गंभीर आरोप

समीर वानखेडे हे आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन आले आहेत. भाजपात ते प्रवेश करणार होते. भाजपा त्यांच्या समर्थनार्थ We Support Sameer Wankhede असे फलक घेऊन रस्त्यावर उतरली होती. त्याप्रकरणात नवाब मलिकांना गुन्हेगार ठरवण्यात आलं. पण, आज सत्य काय समोर आलं आहे.

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एनसीबीच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे आणि इतर तिघांविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आर्यन खान प्रकरणाशी संबंधित हा भ्रष्टाचाराचा गुन्हा आहे. आता या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. ( Sameer Wankhede meetings at the houses of BJP office-bearers Sanjay Raut s serious allegation )

समीर वानखेडे हे आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन आले आहेत. भाजपात ते प्रवेश करणार होते. भाजपा त्यांच्या समर्थनार्थ We Support Sameer Wankhede असे फलक घेऊन रस्त्यावर उतरली होती. त्याप्रकरणात नवाब मलिकांना गुन्हेगार ठरवण्यात आलं. पण, आज सत्य काय समोर आलं आहे. सीबीआयने वानखेडेंवरती गुन्हा दाखल केला असून, अटक होऊ शकते. कदाचित ईडीकडून वानखेडेंची चौकशी होऊ शकते, असा दावा संजय राऊतांनी केला.

मुंबई भाजप नेत्याच्या घरी एनसीबी अधिकाऱ्यांच्या बैठका

राजकारण किंवा प्रशासनातील चोर आणि लफग्यांना भाजप समर्थन देते. आता यावर भाजपचं मत काय आहे? वानखे़डेंना बढती मिळावी यासाठी मुंबई भाजपातील एक स्वयंघोषित नेते दिल्लीत वशिला लावत होता. भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात एनसीबीतील चोरमंडळाच्या बैठका होत होत्या. सगळी खंडणी तिथे गोळा होत असायचीय. हे खरं आहे की नाही, हे भाजपच्या नेत्यानं सांगावं, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. त्या भाजप नेत्याचं लवकरच नावं समोर आणणार असल्याचंही राऊत म्हणाले.

( हेही वाचा: सुप्रीम कोर्टाने ‘हे’ प्रकरण अधिक गांभीर्याने घ्यायला हवे, ठाकरे गटाने व्यक्त केली चिंता )

सनदी अधिकार समीर वानाखेडे यांची कारकीर्द वादग्रस्तच राहिली आहे. अभिनेता शाहरुख खानला २०११ मध्ये समीर वानखेडे यांनी दीड लाखांचा दंड ठोठावला होता. त्यांनतर शाहरुखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणीही समीर वानखेडे यांनी अटक केली होती. मात्र आर्यनकडे ड्रग्ज सापडलेच नव्हते, असा दावा केंद्रीय अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने दिला होता. त्यावेळी माजी मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत होते. आर्यन प्रकरणामुळे समीर वानखेडे यांची अमंली पदार्थ प्रतिंबधक विभागातून बदली करण्यात आली होती.