घरमहाराष्ट्रSanjay Raut : प्रकाश आंबेडकरांनी चार जागांचा विचार करावा, राऊतांचा सल्ला

Sanjay Raut : प्रकाश आंबेडकरांनी चार जागांचा विचार करावा, राऊतांचा सल्ला

Subscribe

मविआकडून वंचितला चार जागांची ऑफर देण्यात आली आहे. तर, या जागांचा आता प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु, अद्यापही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्याकडून जागावाटपाबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, अद्यापही यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याचे समोर आले आहे. पण आता महाविकास आघाडीकडून वंचितला चार जागांची ऑफर देण्यात आली आहे. तर, या जागांचा आता प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. (Sanjay Raut advises that Vanchit Bahujan Aghadi should consider four seats given by MVA)

हेही वाचा… Sanjay Raut : …तर मोदी, शहांना ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती; राऊतांचा घणाघात

- Advertisement -

आज (ता. 17 मार्च) खासदार संजाय राऊत यांना प्रसार माध्यमांनी मविआतील जागावाटप आणि वंचित आघाडीबाबत प्रश्न विचारला. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत हजर होतो. मी स्वत: होतो, शरद पवार, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अशोक गहलोत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे सगळे होते. जागावाटपावर ज्या थोड्या फार अडचणी होत्या त्या मिटवण्यात आल्या असून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू. आज राहुल गांधी यांची सभा असल्याने ते शक्य होणार नाही. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये या संदर्भातील घोषणा करण्यात येईल.

तर, महाविकास आघाडीत 48 जागांवर फॉर्म्युला निश्चित केला आहे. आमचा प्रकाश आंबेडकरांशी संवाद सुरू आहे आणि हा संवाद सुरळीत सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे हे आम्हालाही मान्य आहे. त्याविरोधात प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा सहभाग झाला. आम्ही त्यांना चार जागांची ऑफर दिली आहे. त्याबाबत त्यांच्या पक्षात विचार सुरू आहे. आंबेडकरी जनता आणि वंचित जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. जे संविधान बदलू इच्छितात अशा कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रात थारा मिळू नये. या लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत मिळू नये असे जनतेला वाटते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी त्याचा विचार करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -