घरताज्या घडामोडीमोदींच्या जागी दुसरं कोणी असते तर राष्ट्र, धर्म, भ्रष्टच झाला असता, मोदी-पोप...

मोदींच्या जागी दुसरं कोणी असते तर राष्ट्र, धर्म, भ्रष्टच झाला असता, मोदी-पोप भेटीवर शिवसेनेचा घणाघात

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युरोप दौऱ्यादरम्यान वॅटिकन सिटीत पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर पोप यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. यापुर्वी मोदींनी विदेश दौऱ्यादरम्यान नवाज शरीफ यांना भेटले होते. सोनिया गांधी यांनी तेव्हाच्या पोप यांची भेट घेतल्यानंतर भाजपने काहूर माजवला होता तसेच आताही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागी दुसरं कोणी असते तर राष्ट्र, धर्म, भ्रष्टच झाला असता अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे. मोदींनी पोप यांची भेट घेतल्यानंतर त्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे. तर पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली याबाबत मोदींचे सामनातून कौतुकही करण्यात आले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी-पोप भेटीवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वर्षांपूर्वी विमान प्रवासादरम्यान अचानक इस्लामाबादेत उतरले आणि नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. तर आता पोप यांची भेट घेतली. पोप यांनी मोदींना पवित्र धर्मग्रंथ बायबल दिला त्यांनी ती प्रत श्रद्धेने मस्तकी लावली. मोदींच्या श्रद्धेला अंधश्रद्धाळू भक्तांना काय म्हणायचे आहे? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष यांनी स्तुतीसुमने उधळली असून मोदी-पोप भेट इतिहासाच्या पुस्तकात नोंद करण्यासारखी असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

मोदींनी पोप यांना गरीबी निर्मूलनावर कोणती माहिती दिली?

मोदी-पोप भेटीमध्ये जगातील गरीबी निर्मूलन, हवामान बदल याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. व्हॅटिकन सिटीतून गरीबीचे निर्मूलन झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील गरीबी निर्मूलनावर कोणती माहिती दिली आहे. मोदी दौऱ्यावर असताना देशात मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आर्थिक टंचाई निर्माण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे योजनेत काम करणाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या गरीबांवर संकट आलं आहे. आपल्या हक्कासाठी गरीब शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांना चिरडून मारण्याचे अघोरी प्रयत्न करण्यात आले. महागाईमध्ये गरीब होरपळला आहे. अशामध्ये देशात गरीबीचे निर्मूलन कसे होणार? असा प्रश्न पोप यांच्या मनातही आला असेल असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

हे मोदींनाच शोभते

पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक नवाज शरीफ यांना भेटतात, पोप यांना भेटतात हे सर्व मोदींनाच शोभते दुसरं कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा, राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता व शुद्धीकरण मोहिम सुरु झाल्या असत्या असा घणाघात संजय राऊत यांनी सामनातून केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  नवाब मलिकांच्या जावयाची सुटका; संबंधितांना हवी होती खंडणीत लँडक्रुझर?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -