घरताज्या घडामोडीनिष्ठावान शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये हे सरकार वाहून जाईल, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

निष्ठावान शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये हे सरकार वाहून जाईल, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Subscribe

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून संजय राऊत नियमितपणे त्यांच्यावर टीका करत आहेत. तसेच, हे सरकर लवकरच कोसळेल असे पुनरुच्चार केला जात आहेत. दरम्यान, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वारंवार सांगत आहेत की नवं सरकार फार काळ टिकणार नाही. त्याप्रमाणे निष्ठावान शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये हे सरकार वाहून जाईल,’ असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. (Sanjay Raut Criticize to shinde-fadnavis government)

हेही वाचा – “मला उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या ठरावाचा पश्चाताप…”; राज ठाकरेंनी स्पष्ट केले शिवसेना फुटण्याचे कारण

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, “शिवसेनेचा लाऊडस्पीकर मागील ५६ वर्षांपासून सुरू आहे. हा लाऊडस्पीकर म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या पिपाण्या राज्यातील जनतेनं बंद करून टाकल्या आहेत.”

भाजपने मनावर दगड ठेवून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री केलं, असं विधान नुकतंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. ‘भाजपमध्ये विचारस्वातंत्र्य नाही, मात्र तरीही काल चंद्रकांत पाटील हे खरं बोलून गेले आहेत. त्यांच्या पोटात जे मळमळत होतं, तेच ओठांवर आलं. भाजप कार्यकर्त्यांच्या त्याच भावना आहेत,’ असं ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – “माझ्यासाठी आधी मनसैनिक बाकीचे नंतर”; एकनाथ शिंदेंचा गट मनसेत विलीन होण्याबाबत राज ठाकरेंचे उत्तर

‘भाजपचे नेते कितीही म्हणत असले की शिवसेना आमच्यासोबत सत्तेत आहेत, मात्र ते खरं नाही. कारण शिवसेना ही सत्तेत नाही तर काल संभाजीनगर, पैठण आणि वैजापुरात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात जी दिसली तीच खरी शिवसेना आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टोला लगावला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -