घरताज्या घडामोडीबैलगाडा शर्यतीसाठी फडणवीसांनी केंद्रातले वजन वापरावे - अमोल कोल्हे

बैलगाडा शर्यतीसाठी फडणवीसांनी केंद्रातले वजन वापरावे – अमोल कोल्हे

Subscribe

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे बहुमताचे सरकार आहे. पक्षीय मतभेद सोडून बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात वजन आहे. त्याचा उपयोग फडणवीस यांनी पशुसंवर्धन मंत्री यांना बैलगाडा शर्यत सुरू होणे का गरजेचे आहे, हे पटवून देण्यासाठी करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्याच्या यादीतील समावेश वगळण्यात यावा या मागणीसाठी फडणवीस यांची मदत ही उपयुक्त ठरेल. आमची सगळ्यांची भूमिका आहे की बैलगाडा शर्यती सुरू व्हायला हव्यात. त्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सगळ्यांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही कोल्हे म्हणाले. एकत्र मिळून जर पुढे गेलो तर नक्कीच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही शर्यत सुरू होईल असेही कोल्हे म्हणाले.

जलीकट्टूसाटी एकत्र मग बैलगाडासाठी का नाही ?

तामिळनाडूत जलीकट्टू स्पर्धेसाठी आंदोलन झाले, तेव्हा राजकीय पक्षांपासून ते विचारवंतांनी एकजूट दाखवली, हीच एकजूट आपण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी नक्कीच दाखवू शकतो. राजकीय मतभेद असलेले विरोधक सोडून आमची प्राणी मित्रांसोबतही पुढे जाण्याची इच्छा आहे. प्राणी मित्रांचे जे काही आक्षेप आहेत ते बसून बोलून सोडवण्याची आमची तयारी आहे. प्राणी मित्रांना आक्षेप असणाऱ्या बैलांच्या शर्यतीबाबतचा एक अहवाल महाराष्ट्र सरकारने सादर केला आहे. त्यामध्ये बैल हा धावण्यासाठी सक्षम प्राणी असल्याचे नमुद करण्यात आले आहे. बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालकांचे एक शिष्टमंडळ हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटले आहे.

- Advertisement -

बैलगाडा शर्यत केवळ शौक म्हणून बघू नका

पोटच्या पोराप्रमाणे बैलगाडा मालक बैलांची काळजी घेतात. आठ वर्षे बंदी असतानाही आजही बैलांची काळजी ही मालकांकडून घेतली जात आहे. बैलांना चांगला खुराक दिला जातो. याला क्रूरता म्हणायचे की प्रेम म्हणायचे ? जिथे
आम्ही प्राणी मित्रांसोबतही चर्चेला बसायला तयार आहोत, असेही कोल्हे म्हणाले. बैलगाडा शर्यतीचा केवळ शौक म्हणून बघू नका. ग्रामीण अर्थव्यवस्थेला हे अत्यंत सक्षम मॉडेल होऊ शकते. देशी गोवंशाचे संरक्षण होतानाच, आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो असेही कोल्हे यांनी सांगितले.


हे ही वाचा – Delta Variantचा कहर! अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये अवघे ५ टक्के ICU बेड्स शिल्लक

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -