घरताज्या घडामोडीउताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण, राऊतांची...

उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण, राऊतांची फडणवीसांवर टीका

Subscribe

शिवसेना माजी खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उताराला लागलेली गाडी आणि विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण असल्याची टीका राऊतांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेतून विरोधकांवर टीका केली आहे. यानंतर संजय राऊतांनीसुद्धा टीका केली आहे. यावेळी अपघात अटळ असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. फडणवीसांनी रविवारी उत्तर सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टिकेवर प्रत्युत्तर दिलं यानंतर आता संजय राऊतांनी टीका केली आहे.

शिवसेना माजी खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊतांनी ट्विट करुन अपघात अटळ असल्याचा इशारा दिला आहे. उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे. अशा आशयाचे ट्विट राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी फणससारखे विरोधकांना सोलले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फणस सोलावा तसे विरोधकांना सोलून काढले आहे. कंगना राणावतपासून नवनीत राणापर्यंत सर्वांना केंद्र सरकारने एकदम खास सुरक्षा पुरवली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेचा ‘सेल’ लागला आहे किंवा काळा बाजारच सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात अनापशनाप बोला व केंद्रीय सुरक्षेचे खास पथक मिळवा, असे ‘पॅकेज’ लावले आहे. महाराष्ट्रात अनेक टिनपाट लोकांना केंद्राने सुरक्षा पुरवली ही गंमतच आहे, पण कश्मीरात राहुल भट्टसारख्या लोकांना कोणतीही सुरक्षा नाही व ते दिवसाढवळ्या मारले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा मुद्दा बिनतोड आहे असे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : धर्मवीर चित्रपटाचा शेवट मुख्यमंत्र्यांनी टाळला, म्हणाले आनंद दिघेंचा मृत्यू…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -