घरताज्या घडामोडीआम्ही दुःखी आहोत, मराठी माणूस हरलाय, बेळगाव निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

आम्ही दुःखी आहोत, मराठी माणूस हरलाय, बेळगाव निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

जर तुमचा भगवा झेंडा खरंखर असेल तर जेव्हा कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा उतरवला तेव्हा तुमच्या तोंडात बोळकं का होते?

बेळगावात महाराष्ट्र एकिकरण समितीचा पराभव झाला आहे. बेळगाव महापालिकेत अवघ्या दोन जागांवर महाराष्ट्र एकिकरण समितीचा विजय झाला आहे. मराठी माणासाचा पराभव झाला आहे. आम्ही फार दु:खी आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. बेळगाव महापालिकेवर भाजपचा भगवा फडकल्यामुळे महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून पेढे वाटण्यात येत आहेत. त्यांना संजय राऊतांनी खडेबोल सुनावले आहेत. पेढे वाटणाऱ्यांना लाज वाटत नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे. तुमचा भगवा खरा असेल तर मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहा असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र एकिकरण समिती इकडल्या शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे काम करत आहे. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या प्रत्येक भावना बेळगावमध्ये अडकल्या आहेत. आम्ही दुःखी आहोत. आम्हाला फार त्रास होत आहे मराठी माणूस हारल्यामुळे, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही. तुम्ही जर मराठी आहात तर सांगा, बेळगाव महाराष्ट्रात आला पाहिजे म्हणून सांगताय? बोलताय ? तर आम्ही तुमचा भगवा खरा समजू असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राजकारण बाजूला ठेवा

बेळगावात मराठी माणसाने बलिदान दिलं आहे. १०५ हुतात्म्यांमध्ये बेळगावमधील मराठीसुद्धा आहेत. पेढे वाटत आहात मराठी माणूस हारल्यामुळे लाज नाही वाटत तुम्हाला, राजकारण बाजूला ठेवा पण मराठी माणूस म्हणुन तुम्हाला लाज वाटली पाहिजे असे खडेबोल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहेत.

भाजपचा भगवा खरा असेल तर….

जर तुमचा भगवा झेंडा खरंखर असेल तर जेव्हा कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा उतरवला तेव्हा तुमच्या तोंडात बोळकं का होते? मराठी माणसं, मुलांवर आरोप, गुन्हे दाखल होत आहेत तेव्हा तुम्ही का गप्प राहता? तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही. तुम्ही जर मराठी आहात तर सांगा, बेळगाव महाराष्ट्रात आला पाहिजे म्हणून सांगताय? बोलताय ? तर आम्ही तुमचा भगवा खरा समजू अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्रात पेढे वाटणाऱ्यांना लाज नाही वाटत? संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -