घरमहाराष्ट्रसंजय राऊतांचं तुरुंगातही वाचन-लिखाण सुरूच, वाचा दिनक्रम!

संजय राऊतांचं तुरुंगातही वाचन-लिखाण सुरूच, वाचा दिनक्रम!

Subscribe

लिहिण्या-वाचण्याकरता त्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, घरच्या जेवणाची आणि औषधांची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना निमयित घरातून जेवणाचा डबा येतो.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या मनी लॉड्रिंग प्रकरणी (Money laundering Case) न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. सध्या ते आर्थर रोड तुरुंगात (Arthor Road Jail) असून त्यांचं नियमित वाचन आणि लिखाण सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात नसून सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच त्यांनाही नियम लागू असल्याचं समोर आलं आहे. तसेच, ८९५९ असा त्यांना कैदी क्रमाकं आहे. (Sanjay Raut read and write in jail read routine of sanjay raut in jail)

हेही वाचा – संजय राऊतांच्या भेटीसाठी शिवसेनेचे आमदार- खासदार ऑर्थर रोड कारागृहात, पण…

- Advertisement -

सामनासाठी अग्रलेख लिहू देण्याची परवानगी संजय राऊत यांनी मागितली होती. मात्र, त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली होती. मात्र, तुरुंगात असतानाही ते नियमित वाचन आणि लेखन करत असल्याची माहिती समोर आली आहे. ते त्यांचा सर्वाधिक वेळ लिखाण, वाचन आणि बातम्या पाहण्यात घालवत आहेत. दरम्यान, तुरुंगात लिहिलेलं तुरुंगाबाहेर येणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येत आहे. लिहिण्या-वाचण्याकरता त्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, घरच्या जेवणाची आणि औषधांची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना निमयित घरातून जेवणाचा डबा येतो.

संजय राऊत न्यायालयीन कोठडीत

- Advertisement -

३१ जुलै रोजी पत्रा चाळ प्रकरणी मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप करत ईडीच्या पथकाने संजय राऊत यांच्या घरी छापे टाकले. त्यांच्या घरी ईडीने त्यांची नऊ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. कार्यालयातही त्यांची आठ तास चौकशी झाली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ईडी कोठडीत ठेवण्यात आलं. सुरुवातीला त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली. त्यानंतर ८ ऑगस्टपर्यंत ही कोठडी वाढली. आता २२ ऑगस्टपर्यंत ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा – पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

काय आहे पत्रा चाळ जमीन घोटाळा?

मुंबईतील गोरेगाव इथे पत्रा चाळ आहे. महाराष्ट्र सरकारने चाळींमध्ये राहणाऱ्या ६७२ भाडेकरूंना फ्लॅट देण्याची सरकारी योजना आखली, तेव्हा हा घोटाळा सुरू झाला आणि एचडीआयएलची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने भाडेकरूंसाठी सदनिका बांधण्याचे कंत्राट दिले. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना ६७२ सदनिका देऊन ३ हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. चाळीतील ४७ एकर जागेवर हे फ्लॅट्स बांधले जाणार होते, पण गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅट्स दिले नाहीत. कंपनीने ४७ एकर जमीन इतर आठ बिल्डर्सना १,०३४ कोटी रुपयांना विकली. या जमीन घोटाळ्यात एचडीआयएल कंपनीने केलेल्या घोटाळ्यांमध्ये प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवान यांचा समावेश आहे. प्रवीण राऊत हा संजय राऊतांचा मित्र असून, ईडीच्या तपासात त्याचे नाव पुढे आले आहे.

हेही वाचा – भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, यावरही लेख लिहा; भाजपचा संजय राऊतांना सल्ला

संजय राऊत यांच्या पत्नीचाही जमीन घोटाळ्यात सहभाग

प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते, ज्याचा वापर संजय राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. या जमीन घोटाळ्यातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचे नावही संजय राऊत यांच्याशी जोडले गेले होते. सुजित हा संजय राऊतांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही पत्रा चाळ जमीन घोटाळ्याच्या पैशातून खरेदी करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -