MIFF2022 : सुप्रसिद्ध सिनेलेखक संजित नार्वेकरांना डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान

नार्वेकर यांनी चित्रपट क्षेत्रात विशेषत: चित्रपट इतिहास आणि माहितीपट चित्रपट चळवळीसाठी केलेल्या व्यापक, कक्षा रुंदावणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण कामासाठी त्यांची यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड केली गेली आहे.

Sanjit Narwekar is being conferred with the Dr. V. Shantaram Lifetime Achievement Award

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या १७ व्या पर्वात अर्थात मिफ २०२२च्या मुंबईत झालेल्या शुभारंभाच्या शानदार सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि सुप्रसिद्ध सिनेलेखक संजित नार्वेकर यांना यंदाच्या डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. आयुष्यभर ज्यांच्या चित्रपटांचा अभ्यास आणि संधोशन केले, त्या डॉ. व्ही. शांताराम यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य असल्याचे यावेळी नार्वेकर म्हणाले.

सुप्रसिद्ध सिनेलेखक संजित नार्वेकरांना केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य, ग्राहक व्यवहार आणि अन्न तसेच सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माहितीपट क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिनेसृष्टीतील नामवंत दिग्गजांना हा पुरस्कार दिला जातो.

आयुष्यभर ज्यांच्या चित्रपटांचा अभ्यास आणि संधोशन केला, त्या डॉ. व्ही. शांताराम यांच्या नावाने असलेला पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य समजतो अशा शब्दात संजित नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नार्वेकर यांनी आपल्याला माहितीपट निर्मिती चळवळीकडे वळवणाऱ्या तसेच फिल्म्स डिव्हिजनमधल्या कर्मचाऱ्यांसह मदत करणाऱ्या इतर सगळ्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

माहितीपट निर्मिती चळवळीत मोलाचं योगदान

नार्वेकर यांनी चित्रपट क्षेत्रात विशेषत: चित्रपट इतिहास आणि माहितीपट चित्रपट चळवळीसाठी केलेल्या व्यापक, कक्षा रुंदावणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण कामासाठी त्यांची यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड केली गेली आहे. एक अभ्यासपूर्ण चित्रपट इतिहासकार, चतूरस्त्र लेखक, एक कुशल संपादक ,संकलक ,एडीटर आणि चित्रपट निर्माते अशी अनेक बिरुदे धारण केलेल्या नार्वेकर यांनी, उत्तम सिनेमा निर्मिती आणि ललित कला, विशेषतः माहितीपट निर्मिती चळवळीच्या उत्थानासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. चित्रपटांचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यासाठी नार्वेकर यांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं. त्यांच्या या प्रवासानं अनेकांच्या हृदयाला, मनाला स्पर्ष केला, इतकंच नाही, तर काहीतरी उत्तम, महान आणि सुंदर काम करण्यासाठी अनेकांना प्रेरीत केलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं गेलं होतं

नार्वेंकर यांना १९९६ साली चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं गेलं होतं. चित्रपट जगताविषयीचं नार्वेकर यांचं अपार प्रेम आणि वेड त्यांच्या लिखाणात उतरल्याचं दिसतं. नार्वेकर यांनी आजवर, त्यांना सुवर्ण कमळ जिंकून देणाऱ्या ‘मराठी सिनेमा इन रेट्रोस्पेक्ट’ या पुस्तकासह चित्रपट क्षेत्रावारच्या २०हून अधिक पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं आहे. फिल्म्स डिव्हीजनची निर्मिती असलेल्या, दिग्गज चित्रपट निर्माते डॉ. व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारीत ‘द पायोनिअरिंग स्पिरीट : डॉ. व्ही. शांताराम’ या जीवनपटाचं दिग्दर्शनाचं श्रेय नार्वेकर यांचंच. यासोबतच नार्वेकर यांना विविध विषयांवरील अनेक माहितीपटांचं लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. याचबरोबरीनं चित्रपट क्षेत्रावरील लिखाणाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठीचे परीक्षक म्हणून आणि असंख्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे निवड समीतीचे सदस्य आणि परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहीलं आहे.

नार्वेकरांची निवड करताना आनंदच

हा जीवनगौरवर पुरस्कार म्हणजे नार्वेकर यांचं वैचारीक नेतृत्व, या क्षेत्राला त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन, त्यांनी आयुष्यभर ललित कलेतील अमूल्य सौंदर्याचं घडवलेलं दर्शन, विविध गोष्टींकडे पाहण्याचा दिलेला नवा दृष्टीकोन, आणि त्या समजून घेत त्याचं प्रतिबिंब स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात उमटवण्याचा दिलेला विचार याचाच प्रामाणिकपणानं केलेला गौरव आहे. आणि म्हणूनच या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी नार्वेकर यांची निवड करतांना आपल्याला अत्यंत आनंद झाल्याचं या पुरस्कारासाठीच्या निवड समितीवरील परीक्षकांनी म्हटलं आहे.

डॉ. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेचा डॉ. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार दरवर्षी दिला जातो. सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक डॉ . व्ही शांताराम हे फिल्म डिव्हिजनशी दीर्घकाळ संबंधित होते आणि १९५० च्या दशकांत ते फिल्म्स डिव्हिजन या संस्थेचे मानद चित्रपट निर्माते राहिलेल्या व्ही शांताराम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. दहा लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माहितीपट क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिनेसृष्टीतील नामवंत दिग्गजांना हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत, एस. कृष्णमूर्ती, श्याम बेनेगल, नरेश बेदी, विजया मुळये यांसारख्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.


हेही वाचा : Rajya Sabha Election : राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होणार, BJPचे धनंजय महाडिक अर्ज भरणार?