घरCORONA UPDATEपहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन अभ्यासातून सुटका, 'या' महिन्यात शाळा सुरू!

पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन अभ्यासातून सुटका, ‘या’ महिन्यात शाळा सुरू!

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा कशा सुरु करायच्या याबाबत शिक्षण विभागाकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे.

जुलैपासून ऑनलाईन शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभाग विचार करत असले तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून सूट देणे आणि नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग फक्त जुलैमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला असून, त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा कशा सुरु करायच्या याबाबत शिक्षण विभागाकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे. या कृती आराखड्यानुसार जुलैपासून ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचा विचार शिक्षण  विभागाकडून करण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणाचा लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता शिक्षण विभागाने इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळले आहे. तसेच तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दररोज कमाल एक तास, सहावी ते आठवी कमाल दोन तास आणि नववी ते बारावीसाठी कमाल तीन तास वर्ग घेण्यात यावे. या वर्गादरम्यान विद्यार्थ्याना सुट्टी देण्यात येणार आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे शाळा सुरु करण्यापूर्वी एक महिना गावामध्ये किंवा परिसरामध्ये कोविड १९ चा रुग्ण आढळला नाही याची खात्री करून शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला असून त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

शाळा सुरु करण्यासंदर्भातील वेळापत्रक

इयत्ता                                            दिनांक

- Advertisement -

नववी, दहावी, बारावी                   जुलै २०२० पासून

सहावी ते आठवी                         ऑगस्ट २०२० पासून

पहिली ते पाचवी                         सप्टेंबर २०२० पासून

अकरावी                                  दहावीच्या निकालावर आधारित अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर


हे ही वाचा – जयश्रीने रचला इतिहास, बुकिंगमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -