घरक्रीडाCSK vs GT : चेन्नईचा सलग दुसरा विजय; गुणतालिकेतही अव्वल

CSK vs GT : चेन्नईचा सलग दुसरा विजय; गुणतालिकेतही अव्वल

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या 17व्या पर्वातील दुसरा विजय चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मिळवला. चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात चेपॉक स्टेडियमवर सामना झाला असून, चेन्नईने गुजरातचा 63 धावांनी पराभव केला.

इंडियन प्रीमिअर लीगच्या 17व्या पर्वातील दुसरा विजय चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मिळवला. चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात चेपॉक स्टेडियमवर सामना झाला असून, चेन्नईने गुजरातचा 63 धावांनी पराभव केला. या विजयामुळे चेन्नईचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. (csk vs gt chennai super kings defeat gujarat titans by 63 runs ipl 2024)

चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने दिलेल्या 207 धावांचे आव्हान गुजतरातसमोर ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने फक्त 143 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार शुभमन गिल फक्त आठ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर वृद्धीमान साहाही लगेच बाद झाला. साहा 21 धावा काढून बाद झाला. यामध्ये चार चौकार लगावले.

- Advertisement -

साई सुदर्शन याने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. साई सुदर्शन यानं 31 चेंडूमध्ये 37 धावांची संथ खेळी केली. या खेळीमध्ये साई सुदर्शन यानं तीन चौकार लगावले. तसेच, विजय शंकर यालाही वेगाने धावसंख्या काढता आल्या नाहीत. विजय शंकर याला 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावाच काढता आल्या. डेविड मिलरही स्वस्त:त बाद झाला. मिलर 16 चेंडूमध्ये तीन चौकारासह 21 धावा काढून बाद झाला. उमरजाई याने 10 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने 11 धावा केल्या. तर राहुल तेवातिया 11 चेंडूमध्ये सहा धावा करु शकला. राशिद खान एका धावेवर बाद झाला. उमेश यादव 10 धावांवर नाबाद राहिला.

गुजरातकडून साई सुदर्शन याने 37 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच भेदक मारा केला. तुषार देशपांडे, दीपक चाहर आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर डॅरेल मिचेल आणि पथिराणा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

- Advertisement -

हेही वाचा – CSK vs GT : गुजरातने नाणेफेक जिंकली, चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -