घरताज्या घडामोडीरेमडेसिवीरचा साठा जप्त करा, राज्य सरकारचे FDAला आदेश

रेमडेसिवीरचा साठा जप्त करा, राज्य सरकारचे FDAला आदेश

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना लसीपासून ते औषधांपर्यंतचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी अनेक मेडिकलच्या बाहेर मोठ मोठ्या रागा लोकं लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कठोर पाऊल उचलली जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारकडून FDAला दिले आहेत. केंद्राने निर्यात बंदी केल्यानंतर इंजेक्शनचा साठा पडून राहिला आहे. हाच रेमडेसिवीरचा साठा जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची निर्यात थांबवली होती. आता निर्यात थांबवल्यामुळे रेमडेसिवीरचा साठा देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. काल राज्य सरकारने ज्याची निर्यात थांबवली आहे त्यांना महाराष्ट्रात रेमडेसिवीर विकण्याची परवानगी दिली आहे. मला पूर्ण खात्री आहे पुढच्या २०-२१ तारखेपर्यंत महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा पुरवठा नियमित होईल, असा विश्वास अन्न आणि औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे व्यक्त केला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करुन दिली आहे. तसेच राज्यसरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे असे सांगितले आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन साठा मिळालाय, भ्रष्टाचारी राज्य सरकारमुळे जनतेचे हाल पीयूष गोयल यांचे

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -