घरठाणेठाण्यात कृत्रिम तलावात बुडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू

ठाण्यात कृत्रिम तलावात बुडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू

Subscribe

सात वर्षीय बालकाचा कृत्रिम तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील आंबेघोसाळे परिसरात ही घटना घडली. आंबेघोसाळे परिसरात गणपती विसर्जनासाठी तलाव तयार करण्यात आले होते.

सात वर्षीय बालकाचा कृत्रिम तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील आंबेघोसाळे परिसरात ही घटना घडली. आंबेघोसाळे परिसरात गणपती विसर्जनासाठी तलाव तयार करण्यात आले होते. या तलावामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा मृत्यू झाल आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. (seven year old boy died after drowning in an artificial lake in Thane)

जैहद अजहर शेख या 7 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ठाण्यातील राबोडी अपना नगर,गल्ली क्र. 1 मध्ये जैहद अजहर शेख राहत होता. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातील पाण्यात जैहद हा पोहण्यासाठी उतरला होता. त्यावेळी जैहद याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला, असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

जैहद बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी जैहद याला बाहेर काढले. त्याचा मृतदेह बाहेर काढल्यावर पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दीड दिवसांच्या एकूण 55 हजार 564 गणेशमूर्तींचे विसर्जन

- Advertisement -

मुंबईत रात्री 12 वाजेपर्यंत दीड दिवसांच्या एकूण 55 हजार 564 गणेशमूर्तीं व 59 हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, सार्वजनिक 231 गणेशमूर्तींचा व 55 हजार 333 घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. 98 सार्वजनिक गणेशमूर्तींचा व 32 हजार 793 घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले. तसेच 45 हरतालिकांचेही विसर्जन करण्यात आले.

याशिवाय, एकूण गणेशमूर्ती विसर्जनात कृत्रिम तलाव विसर्जन स्थळी एकूण 22,673 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये, 133 सार्वजनिक गणेश मूर्तींचा तर 22 हजार 540 घरगुती मूर्तींचा समावेश आहे. तसेच, 14 हरतालिकांचेही विसर्जन करण्यात आले.


हेही वाचा – प्रवाशांना बाप्पा पावला; रविवारी रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -