घरमहाराष्ट्रशरद पवार आणि गौतम अदानींची भेट; अजित पवार म्हणाले, अजून आरोप...

शरद पवार आणि गौतम अदानींची भेट; अजित पवार म्हणाले, अजून आरोप…

Subscribe

पुणेः उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यांच्यावरील चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. त्या समितीचा अहवालानंतर बाकीच्या गोष्टी ठरतील, असे सुचक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे येथे केले.

अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी माध्यमांसी संवाद साधला. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीसंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, शरद पवार हे गौतम अदानी यांना भेटायला गेले नव्हते. गौतम अदानी हे शरद पवार यांच्या घरी गेले होते. गौतम अदानी यांच्यवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी ठरतील. मात्र ओळखीच्या माणसाने ओळखीच्या माणसाला भेटणं यात काही चूक नाही.

- Advertisement -

गौतम अदानी यांनी शरद पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. उभयंतांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चांना राजकीय चर्चांना उधाण आले. महाविकास आघाडीचा घटक पक्ष कॉंग्रेसने अदानी समुहावरील आरोपाची संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. याला शरद पवार यांनी विरोध केला होता. अदानी समूहावर आरोप करणारे हिंडनबर्ग हे कोण आहेत. मी त्यांना ओळखत नाही. मी पहिल्यांदाच त्यांचे नाव ऐकले आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या होत्या. नंतर शरद पवार यांनी घुमजाव केले. अदानी समुहाची संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी विरोधी पक्षांची मागणी असेल तर माझा विरोध नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली होती.

त्यानंतर गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने नव्याने राजकीय चर्चा रंगल्या. कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या भेटीवर खोचक टीका केली होती. अदानी हे शरद पवार यांचा सल्ला घ्यायला गेले असतील, असा टोला चव्हाण यांनी लगावला होता. मात्र अजित पवार यांनी या भेटीवर सावध प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -