भिक्षा मागणार्‍या मुलांसाठी ती झाली अन्नदात्री!

रोजंदारीवर काम करणार्‍या, तसेच भिक्षा मागून उदरनिर्वाह करणार्‍यांना दगडे खानावळीत येऊन भोजन करण्याचे आवाहन केले आहे.

Food donor
भिक्षा मागणार्‍या मुलांसाठी ती झाली अन्नदात्री!

करोनाने जगभर थैमान घातले असताना भारतात देखील करोनाचे परिणाम दिसून आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्यात आले आहे. यामुळे भिक्षा मागून पोटाची खळगी भरणार्‍यांचे कमालीचे हाल झाले आहेत. अंध व्यक्तींचे, अनाथ मुलांचे जे भीक मागून पोट भरतात, यांचे खूप हाल झाले आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! ‘करोना’ पाठोपाठ चीनमध्ये नवा ‘हंता’ व्हायरस; एकाचा मृत्यू

महाभयंकर करोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीचा बुस्टर डोस सरकारने दिल्यानंतर हातावर पोट असणारे, तसेच भिक्षा मागून पोटाची खळगी भरणार्‍यांचे कमालीचे हाल झाले आहेत. त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अंध आणि अपंग व्यक्तींना नेहमीच मोफत भोजन देणारी अन्नदात्री अर्थात रसायणी येथील दगडे खानावळीच्या बेबीताई जगदीश दगडे यांनी अशा सर्व गरजूंना बंद काळात मोफत भोजन देण्याची व्यवस्था केली आहे. रोजंदारीवर काम करणार्‍या, तसेच भिक्षा मागून उदरनिर्वाह करणार्‍यांना दगडे खानावळीत येऊन भोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ही सेवा रविवारी २२ मार्चपासून सुरू केली आहे. त्यांच्या या परोपकारी आणि सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.