घरमहाराष्ट्रमतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है, संजय राऊतांनी...

मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है, संजय राऊतांनी केला व्हिडीओ ट्विट

Subscribe

संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. सोबत त्यांनी बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? असा प्रश्न केला आहे.

काय आहे व्हिडीओत –

- Advertisement -

गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका भाषणाचा हा व्हिडीओ असून या व्हिडीओत गुलाबराव पाटील यांनी  शिवसेनेत पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेत रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय. हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. ‘कतलिया कही साप बदल लेते है, पुण्य की आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है’, असं गुलाबराव पाटील या व्हिडीओत म्हणत आहेत.

- Advertisement -

सामनातून भाजपवर टीका –

राजकीय विरोधकांविरोधात खोटे आरोप करणाऱ्या, धमक्या देणाऱ्या भाजपपुरस्कृत मंडळींना ‘वाय’पासून ‘झेड’पर्यंत सुरक्षा देण्याचा सपाटाच केंद्रातील भाजप सरकारने लावला आहे. देशभारत अशा ‘वाय’वाल्यांची फौजच त्यांना उभी करायची आहे काय? त्यांच्या फौजेत आता गुवाहाटीमध्ये असलेल्या 15 गद्दार नाच्यांची भर पडली आहे. त्यांनाही केंद्राने ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय केंद्रीय सुरक्षेची ‘वाय झेड’ करणारा तर आहेच, शिवाय गुवाहाटीत सुरू असलेल्या महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत सुरू असल्याचा पुरावादेखील आहे. भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचे पितळ त्यामुळे पूर्णपणे उघडे पडले आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -