घरमहाराष्ट्रमी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धव ठाकरेच राहतील, शहाजी पाटलांचा 6 महिन्यांपूर्वीचा...

मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धव ठाकरेच राहतील, शहाजी पाटलांचा 6 महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… येकदम ओक्केमध्ये आहे, असे सांगोल्याच्या शाहाजी बापू पाटील यांचे डॉयलाग सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान आता शहाजी पाटील यांचा सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. माझ्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षात आपल्याला 240 कोटींचा विकासनिधी दिल्याचे ते सांगत आहेत. तसेच मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धव ठाकरे राहतील असेही ते म्हणताना दिसत आहेत.

यापूर्वी झाले होते कॉल रेकॉर्डिंग व्हायरल – 

- Advertisement -

यापूर्वी आमदार शाहजी पाटील यांचे जे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे त्यात पुरेसा विकासनिधी मिळत नसल्याने नाराज आहेत, अशी खंत ते व्यक्त करत आहेत. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील मग आपल्या मतदारसंघात ऐतिहासिक कामे करु असे बोलतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या पत्रकार परिषदेतील संवादात विकासनिधीबाबत माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही, असे शहाजी पाटील यांनी म्हटले होते.

सहा महिन्यांपूर्वी शहाजी पाटील पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते –

- Advertisement -

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोन वर्षात 240 कोटी रुपयांचा विकासनिधी दिला आहे. मी आता 1047 कोटींचा निधी मागितला असून मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हे आर्थिक वर्ष संपताना या तालुक्यातील विकासनिधीचा आकडा दीड हजार कोटी रुपयांच्या पुढे जाईल, अशी माहिती आमदार शाहजी बापू पाटील यांनी दिली होती. शिवसेना पक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मी कडवा आहे.  मी कडवाच राहणार आहे. मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धव जी ठाकरेच राहतील. हा पक्ष मी राजकीय गणिताने स्वीकारलेला नसून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व या भावनेने स्वीकारला आहे. माझ्या मृत्यूपर्यंत हीच भावना राहणार आहे. माझे नेते उद्धवजी ठाकरेच आहेत आणि मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धव ठाकरेच राहतील हे मी नम्रतापूर्वक सांगतो.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -