घरताज्या घडामोडीसंजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले

Subscribe

शिवसेनेचे खासदार आणि सामना दैनिकाचे संपादक संजय राऊत यांनी भाजपवर शाब्दिक बाण सोडण्याचा सिलसिला सुरुच ठेवला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागला होता. त्यानंतर ते रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला करत होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेणे बंद केले असले तरी ट्विटरच्या माध्यामातू ते भाजपवर शाब्दिक बाण सोडत आहेत. झारखंड विधानसभेच्या निकालानंतर भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटले तर दुसऱ्या बाजुला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एनआरसी लागू होणार नसल्याचे जाहीर सांगावे लागले. या सर्व घटनाक्रमावर आता राऊत यांनी भाजपला डिवचणारे ट्विट केले आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी एक शेर आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी लिहीले आहे की, “तूफान में कश्तियां और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं..” शेर-शायरीच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधायची राऊत यांची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांनी शायरीच्या माध्यमातून भाजपच्या कारभारावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून देशभरात उसळलेल्या असंतोषावर भाष्य केले होते. “ज्या देशात धार्मिक मुद्दयावर शांतात नांदते तो देश महान होतो. जिथे सरकारच धार्मिक मुद्दे निर्माण करत असेल तर समजा देश चुकीच्या लोकांच्या हातात आहे.” असे जळजळीत ट्विट राऊत यांनी केले होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेत भाषण करताना म्हटले होते की, शरद पवार यांनी कमी जागा असून देखील सरकार आणून दाखविण्याचा चमत्कार घडवला. शरद पवार यांनी राज्यात जी रणनीती अवलंबली होती, त्याचप्रकारची रणनीती अवलंबत झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांनी एकत्र येत भाजपची सत्ता उलथवून लावली. त्यानंतर संजय राऊत यांनी याबद्दल ट्विट करत हेमंत सोरेन यांचे अभिनंदन केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -