घरताज्या घडामोडीमाझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या, वेळ आल्यावर उत्तर देणार - सत्तार

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या, वेळ आल्यावर उत्तर देणार – सत्तार

Subscribe

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे राजीनामा देणार असल्याची आजसकाळपासून सुरु होती. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली आहे. मी राजीनामा दिला अशा पुड्या कुणीतरी सोडल्या आहेत. मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच माध्यमांना सर्व प्रश्नांची उत्तरे देणार, अशी भूमिका सत्तार यांनी मांडली आहे. तसेच माझ्या राजीनाम्याची अफवा सोडणाऱ्यांना जाऊन प्रश्न का विचारत नाहीत, असा प्रतिप्रश्नही त्यांनी माध्यमांना केला.

आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक होती. त्याधीच सकाळी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरु झाली. शिवसेनेने अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे वारंवार खंडन केले. मात्र सत्तार यांची प्रतिक्रिया दिवसभरात मिळाली नाही. त्याचा परिणाम असा झाला की, जिल्हा परिषदेतील सत्तार गटाच्या सदस्यांनी भाजपला मतदान केले आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला.

- Advertisement -

खैरेंच्या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री उत्तर देतील

अब्दुल सत्तार हे गद्दार असून त्यांना मातोश्रीवर पाय ठेवू देऊ नका, असी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निकालानंतर दिली होती. यावर सत्तार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलल्यानंतरच यावर प्रतिक्रिया देणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -