घरताज्या घडामोडीविधान परिषदेसाठी सेनेच्या दोन उमेदवारांची निवड, मुंबईच्या सचिन अहिर आणि नंदुरबारच्या आमशा...

विधान परिषदेसाठी सेनेच्या दोन उमेदवारांची निवड, मुंबईच्या सचिन अहिर आणि नंदुरबारच्या आमशा पाडवींचं नाव निश्चित

Subscribe

राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Legislative Council) उमेदवारांची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. शिवसेनेकडून दोन उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. विधानपरिषदेवर सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी (Amsha Padvi) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

राज्यसभेची निवडणूक येत्या १० जून रोजी होणार आहे. तर विधानपरिषदेच्या दहा सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आता २० जूनला विधानपरिषदेसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विधानपरिषदेसाठी भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा १ आणि १० व्या जागेसाठी पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एकीकडे राज्यसभेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दरम्यान, विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकीट देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे माझं भाग्यच…

मी शिवसेनेत सुरूवातीपासूनच काम करत आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी मला तिकीट दिलं, हे माझं भाग्यच आहे. काल मला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा फोन आला होता. त्यांनी मला फोन करून याबाबतची माहिती काल दिली. तसेच आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांनी सुद्धा मला याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे मी आज मुंबईत आलो असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं, आमशा पाडवी यांनी म्हट्लं आहे.

- Advertisement -

कोण आहेत आमशा पाडवी ?

नंदुरबार हा पूर्णपणे काँग्रेसचा काही वर्षांचा बालेकिल्ला आहे. मात्र, आमशा पाडवी यांनी आपली ताकद येथे वाढवली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून नंदूरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना शिवसेनेने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसचे नेते केसी पाडवी यांच्याकडून त्यांचा २ हजार ९६ मतांनी पराभव झाला.


हेही वाचा : महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण, विधानपरिषदेच्या लॉबिंगला लागला ब्रेक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -