घरट्रेंडिंगएकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना; राज्यपालांची घेणार भेट

एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना; राज्यपालांची घेणार भेट

Subscribe

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गोव्याहून मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. गोव्याच्या (Goa) ताज हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित करताना याबाबत माहिती दिली. (Shivsena rebel mla eknath shinde leave from goa to mumbai)

“मी मुंबईला जात आहे. राज्यपालांची (Governor) भेट घेणार आहे आणि लवकरच पुढचा निर्णय सांगीन. सर्व आमदार गोव्यातच आहेत”, असे एकनाथ शिंदे यांनी हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर सांगितले.

- Advertisement -

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी (Rebel MLA) केवळ एकनाथ शिंदेच गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिंदे यांच्यासोबत आमदार रविंद्र चव्हाणही रवाना झाले आहेत. दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. गोव्याच्या हॉटेलमध्ये शिंदे गटाची बैठक झाली आणि या बैठकीनंतरच एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

एकनथ शिंदे गोव्याच्या विमानतळावर दाखल झाले आहेत. लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या गोवा-मुंबई प्रवासाच्या पार्श्वभूमीवर गोवा आणि मुंबईत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिवाय सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

अडीच वर्षात दुसरे सरकार कोसळले

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे गेल्या अडीच वर्षांत कोसळलेले हे दुसरे सरकार आहे. 23 नोव्हेंबर 2019मध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयात या सरकारला आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने खुले मतदान घेण्याचा आदेश दिल्यावर दोघांनीही राजीनामा दिला होता. हे सरकार 80 तासांचे ठरले. आताही सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजीनामा दिला.


हेही वाचा – ‘मेरा पानी उतरता देख…’; देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -