घरताज्या घडामोडीधक्कादायक : देवळा तालुक्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक : देवळा तालुक्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

मुंबईहून आलेली महिला निघाली पॉझिटिव्ह; दोन दिवसांपूर्वीच झाला होता मृत्यू

देवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या (मुंबईस्थित) महिलेचा संशयावरून स्त्राव घेण्यात आला. मात्र त्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला. आज या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
या घटनेने आता गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित महिला मुंबईस्थित असून फुलेनगर ( वासोळ पाडे) येथे एका खासगी दवाखान्यात फक्त उपचारासाठी आली होती. मात्र त्यांना कोरोना सदृश लक्षण दिसून आल्याने त्यांना नाशिक येथे लगेचच पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. म्हणून अन्य नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, मात्र प्रत्येकाने खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे यांनी सांगण्यात आले.
गाव आजपासून रविवारी सायंकाळीपर्यंत खबरदारी म्हणून बंद करण्यात आले असून सर्व नातलग आणि संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच घरोघरीदेखील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -