घरताज्या घडामोडीसिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन दिवस कडक लॉकडाऊन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन दिवस कडक लॉकडाऊन

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार असून शनिवार – रविवारी दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊन असणार आहे. तर कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सोमवार नंतर होमआयसोलेशन बंद केले जाणार असून त्यामुळे 1,014 बेड उपलब्ध केले असून सामाजिक न्यायभवन आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाची वसतिगृहे ही ताब्यात घेतली जाणार आहेत अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा दौरयावर असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर ,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,संजय पडते,संदेश पारकर,अतुल रावराणे,जान्हवी सावंत,नागेंद्र परब,लोकप्रतिनिधी,अधिकारी उपस्थित होते
वीक एण्ड शनिवार रविवार या पुढील दोन दिवसात कडक लॉक डाऊन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या कडक लॉक डाऊन ची अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना ची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10.01 टक्के येवढी पॉजिटिव्ह रुग्ण मिळण्याची स्थिती आहे. तर जिल्ह्याचा मृत्यु दर 2.5 येवढा आहे.जिल्ह्यात सध्या 46 टक्के येवढे रुग्ण होम आइसोलेशन मधे आहेत. तर 13 टक्के रुग्ण शासकीय आइसोलेशन मधे आहेत. जिल्ह्यातील या स्थितीमुळे दोन दिवस कडक लॉक डाउन करणे आवश्यक आहे यासाठी जिल्ह्यातील जनतेने सहकार्य करावे असे सांगतानाच या दोन दिवसाच्या लॉकडाऊन नंतर सोमवारी जिल्हाधिकारी बैठक घेणार असून या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

जिल्ह्यात सद्यस्थितीत 1170 एवढी कोरोना लस डोस शिल्लक असून. जिल्ह्यातील 56 केंद्रापैकी केवळ तीन केंद्रांवर लस दिली जात आहे. उर्वरित सर्व केंद्र बंद असून, जिल्ह्यासाठी दोन लाख लसीची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी वेळेत आली नाही तर जिल्ह्यातील लसीकरण पूर्णपणे बंद होईल असे सांगतानाच ही लस केंद्र शासन राज्य शासनाला पुरवते आणि राज्य शासन सर्व जिल्ह्यांना अशी स्थिती आहे. असे सांगतानाच केंद्र शासनाकडून राज्याला आवश्यक असलेली लस पुरविली जात नसल्याचे त्यांनी सुचित केले. जिल्ह्यात सद्यस्थितीत रेमेडीसिविर ची 1 हजार 470 इंजेक्शन उपलब्ध आहेत. तर अजूनही इंजेक्शन येणार आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांना इंजेक्शन आवश्यक असल्यास रुग्णाची सत्यता पटवून इंजेक्शन दिली जाणार आहेत.

यापुढे होम आयसोलेशन बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थिती 1014 एवढे बेड असून यापैकी 386 बेड ऑक्सिजन चे आहेत तर 67 व्हेंटिलेटर बेड आहेत. जिल्ह्यात अजून बेड ची आवश्यकता भासल्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागातील महाविद्यालयांची वस्तीगृह आणि सामाजिक न्याय विभागाची वस्तीगृह ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या असून, आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकारी ही वस्तीगृह कोरोना सेंटर साठी ताब्यात घेणार आहेत. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले आहे. असे सांगतानाच यापुढे कोरोना रुग्णाला घरी राहून उपचार घेण्यास मनाई करण्यात येणार आहे होम आयसोलेशन मध्ये नियम पाळले जात नाहित अशा अनेक तक्रारी आल्या आहेत आणि त्यामुळे संसर्गही वाढत आहे असे निरीक्षणात आले आहे प्रत्येकाला संस्थात्मक आयसोलेशन मध्येच उपचार घ्यावे लागणार आहेत असेही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुंबईतील वाढत्या कोरोना मुळे आणि कडक उन्हाळामुळे आता चाकरमानी गावी येणार आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्ण आणखी वाढू शकतात त्यामुळे चाकरमान्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेणार असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस कडक लॉक डाऊन असणार आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. बाकी काहीही सुरू नसणार असे यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले . त्यामुळे या कालावधीत कोणीही आपल्या घराबाहेर पडू नये असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले.


 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन दिवस कडक लॉकडाऊन
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -