घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशहरात कुठेही गुन्हेगारी, अवैध कृत्य घडतंय?, व्हॉटस अॅप उघडा अन् 8263998062 या...

शहरात कुठेही गुन्हेगारी, अवैध कृत्य घडतंय?, व्हॉटस अॅप उघडा अन् 8263998062 या नंबरवर पोलिसांना कळवा

Subscribe

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत मागील काही महिन्यात गुन्हेगारीचा आलेख मोठा वाढला आहे. पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, मोक्का, तडीपारी अश्या स्वरूपाचे कठोर पाऊल उचलूनही गुन्हेगारी कमी होतांना दिसत नाहीये. सर्रास हाणामाऱ्या, हल्ले, चोरया, खुनाच्या घटना वारंवार होताना दिसत आहे. एकप्रकारे गुन्हेगार थेट पोलिसांनाच आव्हान देताय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहरात वाढलेल्या गुन्हेगारी मुळे नागरिकांमध्ये चिंतेची आणि भीतीची भावना निर्माण झाली आहे. या अनुषंगाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने व्हॉटस अॅप हेलपलाईन सुरू केली आहे.

नाशिक शहरात कोठेही अनैतिक धंदे, अपघात, बेकायदेशीर कृत्य घडत असेल तर पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. फक्त त्याचे छायाचित्र, व्हिडीओ काढा आणि व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर पाठवता येणार आहे. नाशिक शहर पोलिसांनी ८२६३९९८०६२ या क्रमांकाची व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेशान्वये नियंत्रण कक्षात नागरिकांना माहिती देण्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक कार्यान्वीत करण्यात आला आहे. अपघात, वाहतूक, गुन्हा, अवैध धंद्यांबाबतची माहिती तात्काळ पोलीसांना उपलब्ध व्हावी व त्या अनुषंगाने लवकर कार्यवाही व्हावी, यासाठी नियंत्रण कक्ष नाशिक शहर येथे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ८२६३९९८०६२ कार्यान्वीत करण्यात आला आहे.

शहरातील नागरिकांनी गुन्हे व गुन्हे करणारे, अवैध धंदे याबाबत निदर्शनास येणारी माहिती व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर व्हिडीओ, फोटो व संदेश स्वरूपात, संबंधित ठिकाणाचा पत्ता, लोकेशन व अन्य उपयुक्त माहितीसह दयावी. त्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांना तात्काळ कारवाई करता येणार आहे. हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक शुक्रवारी (दि.१८) पासून सुरु करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -