घरमहाराष्ट्रअजितदादा म्हणाले संस्था उभ्या करायला अक्कल लागते, आता राणेंनी दिलं रोखठोक उत्तर

अजितदादा म्हणाले संस्था उभ्या करायला अक्कल लागते, आता राणेंनी दिलं रोखठोक उत्तर

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा शुक्रवारी निकाल लागला. महाविकास आघाडीला पराभूत करत जिल्हा बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. एक जिल्हा बँकेची निवडणूक तीन पक्ष एकत्र लढतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात आणि पराभव तिन्ही पक्षांना करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात, असं प्रत्युत्तर राणेंनी दिलं आहे.

अजित पवार यांनी सिंधुदुर्गात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आवाहन करताना संस्था उभ्या करायला डोकं लागते, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही, असा टोला राणेंना लगावला होता. त्याला सव्याज राणेंनी परतफेड केली.

- Advertisement -

ही निवडणूक कायद्याचा वापर करुन जिंकायचा प्रयत्न करत होते. कायद्याचा वापर करुन, पोलीस यंत्रणा वापरली सगळी यंत्रणा वापरली. नितेश राणेच्या जामीन अर्जावर चार चार दिवस सुनावणी चालते. आम्ही नाही ऐकलं ५० वर्षांच्या राजकारणात मी नाही पाहिलं. अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक येऊ ठाण मांडतात. कोणाविरोधात? अतिरेक्याविरोधात? एक जिल्हा बँकेची निवडणूक तीन पक्ष एकत्र लढतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात आणि पराभव तिन्ही पक्षांना करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात, असं नारायण राणे म्हणाले.

जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत अखेर राणेंनी बाजी मारली आहे. यामध्ये भाजपकडे ११ तर महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्या ठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.


हेही वाचा – संस्था उभ्या करायला अक्कल लागते; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा टोला

मोठी बातमी! शिवसेनेला धक्का, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -