घरमहाराष्ट्रसिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदार प्रमोद वायंगणकर गायब, कणकवलीत लागले पोस्टर

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदार प्रमोद वायंगणकर गायब, कणकवलीत लागले पोस्टर

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडत असताना पूर्वसंध्येला मतदारच बेपत्ता झाला आहे. मतदार प्रमोद वायंगणकर (४१, तळेरे बाजारपेठ) हे २० डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. वायंगणकर हे तळेरे विकास सोसायटीचे सभासद आहेत. त्यांचे भाऊ शरद वायंगणकर यांनी ते बेपत्ता आहेत, त्यांची माहिती मिळाल्यास संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केला आहे. यासंदर्भात कणकवलीमध्ये पोस्टर लागले आहेत.

प्रमोद वायंगणकर हे शिवसैनिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. त्याआधीच वायंगणकर गायब झाल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. प्रमोद वायंगणकर यांना ३० डिसेंबर पूर्वी तातडीने शोध लावावा, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी कणकवली पोलीसांकडे केली होती. तसंच, शोधलं नाही तर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला.

- Advertisement -

सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापलं

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात बऱ्याच राजकीय घडामोडी घडत असून राजकीय वातावरण तापलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. भाजप आमदार नितेश राणे यांनी हल्ला केला असा आरोप संतोष परब यांनी केला आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. आज त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊ न कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नितेश राणेंना दुसरा झटका; १६ कोटींचं थकीत कर्ज, सहकार विभागाकडून कारवाईचा बडगा


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -