Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Mira road murder case : आरोपी मनोज आणि सरस्वतीचं नातं काय? पीडितेच्या बहिणींचा खुलासा

Mira road murder case : आरोपी मनोज आणि सरस्वतीचं नातं काय? पीडितेच्या बहिणींचा खुलासा

Subscribe

मुंबईतील मीरा रोड येथील धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मीरा रोड येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून विल्हेवाट लावण्याची विकृत मनोवृत्तीची घटना घडली आहे. या प्रकरणाबाबत आरोपी मनोजला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु आरोपी मनोज आणि मृत सरस्वती यांच्यात नेमकं काय नातं होतं?, याबाबत पीडितेच्या तीन बहिणींनी मोठा खुलासा केला आहे.

आरोपी मनोज आणि सरस्वतीचं नातं काय?

५६ वर्षीय लिव्ह इन पार्टनर मनोज साने याने ३२ वर्षीय सरस्वती वैद्य या महिलेची हत्या केली. मात्र, या दोघांचं नेमकं नातं काय होतं?, या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता, पीडित आणि आरोपी हे विवाहित असल्याचे आम्हाला आढळून आले आहे. त्यांच्या विवाहपणाची बाब बहिणींना देखील माहिती होती. परंतु त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांनी हे इतरांपासून लपवले होते, अशी माहिती डीसीपी जयंत बजबळे यांनी दिली.

- Advertisement -

अनाथ आश्रमातील सरस्वतीची मैत्रीण असलेल्या एका महिलेने खुलासा करताना म्हटले की, मृत सरस्वतीने आम्हाला सांगितले की, मनोज हा तिचा मामा आहे. तसेच सरस्वतीमध्ये आणि माझ्यात वडील-मुलीचे नाते होते. दोघांमध्ये कधीही शारीरिक संबंध नव्हते, असा दावाही आरोपीने केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आरोपीने केलेल्या दाव्यानुसार आणि बहिणींनी केलेल्या खुलाश्यानुसार आरोपी मनोज ही तिचा मामा आहे की हे दोघे विवाहित आहेत, याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी करणं महत्त्वाचं आहे.

१६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

दोन ते तीन दिवसांपूर्वी महिलेची हत्या करण्यात आली होती. त्याने कुकरमध्ये जवळपास सात ते आठ तुकडे उकळले होते. या चौकशीत पोलिसांना शरीराचे १३ अवयव सापडले आहेत. या आरोपीला मीरा-भाईंदर येथील कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


हेही वाचा : Mira Road Murder Case : सरस्वती वैद्य हत्याकांडाबाबत नराधम सानेचा खुलासा


 

- Advertisment -