…म्हणून आनंद दिघेंवर बाळासाहेब चिडायचे, उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण

सगळ्यांनी हा चित्रपट आवश्य पाहावा हे मी केवळ पिक्चर जोरात चालावा म्हणून नाही सांगत आहे. तर आयुष्य जगावं कसं हे शिकवणारा एक माणूस आपल्यात होता आणि त्या पिक्चरमधलं एक वाक्य प्रत्येक शहरात एक आनंद दिघे पाहिजे. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

cm uddhav thackeray ordered to Shiv Sena MLAs come to Mumbai for Rajyasabha election
शिवसेना आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश, घोडेबाजार टाळण्यासाठी आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट धर्मवीर मुंबईतल्या थिएटरमध्ये जाऊन पाहिला, यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही नेतेसुद्धा होते. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी चित्रपटाच्या प्रतिक्रिया दिलीय. अत्यंत प्रामाणिकपणाने कलाकाराबद्दल जर मी प्रतिक्रिया दिली, तर मी नक्कीच सांगेन दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद देणारे आमचे आनंद दिघे प्रसाद ओक यांनी पुन्हा जिवंत केलेत, असंच मी म्हणेन. अप्रतिम भूमिका केलेली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत, ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. बाळसाहेब रागावल्याचं चित्रपटात दाखवलं आहे. ते खरं आहे, रागाचं मुख्य कारण असायचं की दिलेल्या वेळेत आनंद दिघे कधीच पोहोचलेत असं व्हायचं नाही आणि बाळासाहेब चिडायचे, असंही त्यांनी सांगितलंय.

आनंदजींच्या बारीकसारीक नकबी होत्या, त्या त्यांनी कशा आत्मसाद केल्या मला कल्पना नाही. पण असं कुठेही जाणवलं नाही आपण चित्रपट पाहतोय. खरंच प्रसाद तुम्ही कमाल केलेली आहे. तुम्हाला मनापासून सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतोय. सगळ्यांनी हा चित्रपट आवश्य पाहावा हे मी केवळ पिक्चर जोरात चालावा म्हणून नाही सांगत आहे. तर आयुष्य जगावं कसं हे शिकवणारा एक माणूस आपल्यात होता आणि त्या पिक्चरमधलं एक वाक्य प्रत्येक शहरात एक आनंद दिघे पाहिजे. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

ज्या वेळेला आपल्या शहरात आनंद दिघे असतील. असं शहरातील लोकांनाच नाही तर तिथल्या गुंडांना पुंडांना वाटेल, त्याच वेळेला तो आनंद दिघे नावाचा धाक, दरारा त्या शहरामध्ये माता भगिनी यांचं रक्षण करेल. एक शिवसैनिक कसा असावा, निष्ठा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, स्वतःचं आयुष्य झोकून देऊन कसं जगायचं हे तुम्ही चित्रपट पाहिल्यावर कळेल. चित्रपटाचा खरा भाग आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे. म्हणून शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघे यांचं नातं दाखवलेलं आहे, मी म्हणेन त्याच्याही पेक्षा घट्ट होतं. असे शिवसैनिक मला लाभले, एकनाथ शिंदे आहेत, राजन विचारे आहेत. हे सगळे शिवसैनिक आनंद दिघेंच्या मुशीतून तयार झालेले आहेत. धर्मनिष्ठा, संघटना आणि आपली जनता यावरती निस्सीम प्रेम करणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. पुढे जाण्याच्या आधी गुरू शिष्याचं नातं कसं असावं हेच आपल्याला पुढे नेणारं आहे. बाळसाहेब रागावल्याचं चित्रपटात दाखवलं आहे. ते खरं आहे, रागाचं मुख्य कारण असायचं की दिलेल्या वेळेत आनंद दिघे कधीच पोहोचलेत असं व्हायचं नाही आणि बाळासाहेब चिडायचे. मग आनंद दिघे यायचे आणि शांत पणाने उभे राहायचे. पहिली एक दोन वाक्ये व्हायची मग विचारायचे कशाला आलास, ठाण्यामध्ये निवडणूक आहे. मग नाही उमेदवारांची यादी, बाळासाहेब फक्त एकच प्रश्न विचारायचे, भगवा फडकवशील. हो, जा कर तुला पाहिजे ते. यादीला ते हातपण नाही लावायचे. एवढा विश्वास मला नाही वाटत गुरू शिष्यापेक्षा घट्ट असलेलं नातं होतं. शेवटचा प्रसंग पाहिलेला नाही. मी व्यथित झालेले बाळासाहेब पाहिलेले आहेत. आपल्या शिवसैनिकांवर प्रेम करणारे बाळासाहेब आणि तसेच आपल्या शिवसैनिकांवरती प्रेम करणारे आनंद दिघे हे अजब रसायन होतं, याचं वर्णन करता येत नाही, अशी भावनाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय.