घरमहाराष्ट्रनिदान गणेशोत्सवात तरी खरं बोला, भाजपाच्या बॅनरबाजीवर शिवसेनेचा पलटवार

निदान गणेशोत्सवात तरी खरं बोला, भाजपाच्या बॅनरबाजीवर शिवसेनेचा पलटवार

Subscribe

मुंबई – कोरोना काळात सर्वच सण-उत्सवांवर बंधने आली होती. यावरून भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. आपलं सरकार आलं, हिंदू सणांवरचं संकट टळलं अशी पोस्टरबाजी करून भाजपाने उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावरून शिवसेनेही भाजपावर पलटवार केला आहे. ‘देशात लॉकडाऊन कोणी जाहीर केला? थाळ्या वाजवा, दिवे लावा कोणी केलं? उद्धवसाहेबांनी सर्व धर्मीयांचे प्राण वाचवले, सण-उत्सवांना बंदी नव्हती, गर्दीला होती. निदान गणेशोत्सवात तरी खरं बोला, तो विघ्नहर्ता आहे’, अशा शब्दात शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपला सुनावलं आहे.

हेही वाचा – ठाकरेंनी दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करा, मुख्यमंत्री शिंदेची राज्यपालांकडे विनंती

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात राजकीय शक्तीप्रदर्शनही सुरू आहे. याकाळात भाजपाने बॅनरबाजी केली. भाजपाच्या या टीकेवर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – फक्त सोन्याचा धूर निघायचा बाकी आहे, बेरोजगारीवरून शिवसेनेची केंद्रावर उपहासात्मक टीका

- Advertisement -

अरविंद सावंत म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य परिषदेने कौतुक केलं. न्यूयॉर्क टाइम्सने कौतुक केलं. इतकंच नव्हे तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. देशाच्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव सातत्याने आलं. उद्धवसाहेबांनी सर्वधर्मीयांचे प्राण कोरोनाच्या कठीण काळच वाचवले. अशावेळी केंद्रात असलेल्या सरकारने काय केलं तर लॉकडाऊन लावला, टाळ्या-थाळ्या वाजवायला सांगितल्या. दिवे लावायला सांगितले. ठाकरे सरकारच्या काळात सण-उत्सवांना बंदी नव्हती, गर्दीला होती. निदान गणेशोत्सवात तरी खरं बोला, तो विघ्नहर्ता आहे.’

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -