घरताज्या घडामोडी२०१९ मध्ये एसटीच्या अपघातांमध्ये वाढ

२०१९ मध्ये एसटीच्या अपघातांमध्ये वाढ

Subscribe

प्रत्येक्ष वर्षी एसटी महामंडळाकडून राज्यभर 15 दिवस सुरक्षितता मोहीम राबविली जाते. मात्र या अभियाना नंतर एसटीच्या अपघातात गेल्या दोन वर्षांत वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये झालेल्या अपघातांची संख्या आणि मृतांचा आकडाही वाढला आहे. 2018-19 मध्ये एकूण 3 हजार 310 अपघात झाले असून त्यात एकूण 441 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक वर्षी सुरक्षा अभियान राबवून सुध्दा अपघात कमी होत नसल्यामुळे एसटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ असे म्हटले जायचे. पंरतू एसटीच्या प्रति लाख किलोमीटर होणार्‍या अपघातांमध्ये गेली दोन वर्षे सातत्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. 2014-15 मध्ये अपघाताची संख्या 3 हजार 172 होती. त्यानंतर 2018-19 मध्ये 3 हजार 310 घरात पोहचली आहे. मिळालेल्या माहितीनूसार एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत एसटीच्या प्रति लाख किलोमीटर मागे होणार्‍या अपघातांचे प्रमाण 0.14 टक्के इतके होते. एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत हेच प्रमाण 0.16 टक्क्यांपर्यंत वाढले. त्यानंतर एप्रिल ते सप्टेंबर 2018 या सहामाईत 0.16 टक्के असलेले प्रति लाख किलोमीटर अपघाताचे प्रमाण एप्रिल ते सप्टेंबर 2019 या सहामाईत 0.17 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे 2017-18 नंतर 2019पर्यंत एसटीच्या प्रति लाख किलोमीटर मागे होणार्या अपघातांच्या प्रमाणात तब्बल 0.03 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.

- Advertisement -

वर्षनिहाय अपघातांची आकडेवारी

2014-15  – 3172
2015-16  – 2920
2016-17  – 2772
2017-18  – 2932
2018-19  – 3310

441 जणांचा मृत्यू

2017-18 मध्ये एसटीच्या अपघातांची संख्या 2 हजार 932 इतकी होती. तसेच या अपघातांमध्ये एकूण 424 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. मात्र 2018-19 मध्ये एकूण 3 हजार 310 अपघात झाले असून त्यात एकूण 441 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 377 अपघात प्राणांतिक, 1 हजार 974 गंभीर आणि 959 किरकोळ प्रकारचे होते. या अपघातांमध्ये एसटीचे 38 प्रवाशांसह 3 कर्मचार्यांचा मृत्यू झाला. याशिवाय एसटी कर्मचारी व प्रवाशांव्यतिरिक्त इतर 400 लोकांना अपघातांमध्ये मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -