घरताज्या घडामोडीCoronavirus: एसटीतून प्रवाशांचा उपाशी प्रवास

Coronavirus: एसटीतून प्रवाशांचा उपाशी प्रवास

Subscribe

एसटी महामंडळाचे ५० हॉटेल थांबे बंद प्रवाशांचा आरोग्याची खबरदारी म्हणून घेतला निर्णय

एसटीच्या प्रवासामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे करोना विषाणूची लागण प्रवाशांना होऊ नये, यासाठी एसटी महामंडळ सर्वप्रकारची दक्षता घेत आहे. राज्यभरात एसटी महामंडळाच्या लांबपल्याच्या महामार्गावर एसटी प्रवाशांसाठी असलेल्या अधिकृत हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील महामार्गावर असलेले सुमारे ५० हॉटेल बंद होणार आहेत. त्यामुळे आता एसटी प्रवाशांना उपाशीपोटी प्रवास करावा लागणार आहे.


हेही वाचा – शीना बोरा हत्याकांड: पीटर मुखर्जीची अखेर सुटका!

- Advertisement -

राज्यभरातील एसटी महामंडळाचा महसूल वाढावा आणि सोबतच एसटीच्या प्रवाशांना जेवणाची व नाश्ताची उत्तम सुविधा मिळावी यासाठी राज्यभरात अधिकृत हॉटेलांमध्ये प्रवाशांसाठी एसटीला थांबे देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाकडून राज्यभरात लांबपल्याच्या प्रवासासाठी एसटी बसेस वेगवेगळ्या आगारातून सोडल्या जातात. त्यासाठी महामार्गावर येताना आणि जाताना हॉटेल निश्चित केले आहेत. त्याच हॉटेलवर एसटी बसेस थांबवल्या जातात. बस थांबल्याबाबत हॉटेल व्यावसायिकाकडून वाहक पास भरून त्यावर सही व शिक्का घेतात. तो पास संबंधित आगारात जमा करावा लागतो. त्यावरून बस अधिकृत हॉटेलवर थांबल्याची नोंद घेतली जाते. अशा सुमारे ८ हजार एसटी बसेस महामार्गावर दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी थांबा घेतात. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून प्रवाशांची विशेष काळजी घेतली जात आहे.

या मार्गांवरील प्रवाशांना करावा लागणार उपाशी प्रवास

एसटी महामंडळाचा सर्वाधिक लांबपल्ल्याचा गाडया या मुंबई- पुणे, ठाणे- नगर, मुंबई- नाशिक, मुंबई- सोलापूर, मुंबई- कोल्हापूर, मुंबई- रत्नागिरी असे अनेक मार्गावरुन धावतात. यामार्गांवर प्रवासी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे प्रवासात अधिकृत हॉटेल बंद केल्यामुळे प्रवाशांची जेवण्याची आणि नाश्ताची फज्जीती होणार आहे. मात्र या लांबपल्ल्याचा गाडयातील प्रवाशांना बस पकडण्यापूर्वी याची सुचना एसटी महामंडळाकडून देण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रवाशांनो जरा जपून

एसटी महामंडळाच्या एका अधिकार्‍यांने दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलत असताना सांगितले की, एक जबाबदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटीने या पूर्वीपासूनच करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील प्रमुख गर्दीचे बसस्थानके दिवसातून दोन-तीन वेळा सॅनिटायझर वापरून स्वच्छ धुणे. तर प्रत्येक बस लिक्विड मिश्रित पाण्याने दररोज धुवून काढणे. प्रत्येक बसस्थानकावरील उद्घोषणा यंत्राद्वारे प्रवाशांना करोना आजारासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही अधिकृत हॉटेलवर प्रवाशांचा जेवणासाठी थांबा बंद केला आहे. मात्र प्रवाशांनी प्रवासापुर्वी काही तरी खाऊन प्रवास करावा तसेच आरोग्यदायी पोषण आहार स्वत: जवळ बाळगावा.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -