घरमहाराष्ट्रst workers strike : एसटीच्या संपामुळे नुकसान कर्मचाऱ्यांचे होतेय, सदावर्तेंचे नाही-...

st workers strike : एसटीच्या संपामुळे नुकसान कर्मचाऱ्यांचे होतेय, सदावर्तेंचे नाही- अनिल परब

Subscribe

“एसटी गरीब जनतेची नाळ एसटीचा संप लवकरात लवकर मिटावा” अशी प्रार्थना आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज गणपतीपुळे मधील श्रींच्या चरणी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उर्वरित संपकरी एसटी कर्मचारी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच नुकसान एसटी कर्मचाऱ्यांचे होतेय, सदावर्तेंचे नाही असं प्रतिपादनही केले आहे. परिवहन मंत्री अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की, “एसटी कर्मचाऱ्यांना हमी दिली आहे की, कुठल्याही परिस्थितीत २० तारखेला विलिनीकरण करुन दाखवतो. कशाच्या जोरावर मला माहीत नाही. कुठल्या कायद्याअंतर्गत मला माहीत नाही. परंतु कामगारांची दिशाभूल चालली आहे. कामगार भरकटले आहेत. यात कामगारांचे आणि एसटीचे नुकसान होत आहे. सदावर्तेंचे होत नाही. यात कामगार भरडले जात आहे. कामावर नाहीत त्यांचा पगार गेलेला आहे. अगोदरचं आपला पगार कमी आहे असे म्हणताय आणि अशावेळेला पगार न मिळणं योग्य नाही.” असही अनिल परब म्हणाले.

- Advertisement -

“आज १० हजार पेक्षा जास्त कामगार निलंबित झालेत. अडीच हजारांपेक्षा जास्त रोजंदारीवर असणाऱ्या लोकांची नोकरी समाप्त झालेली आहे. प्रशासनानाला कारवाईचे एक एक पाऊल पुढे टाकावे लागतेय. जे निलंबित झालेत ते बडतर्फीसाठी पुढे सरकतील. पण सरकारची बिलकुल इच्छा नाही परंतु लोकांना वेठीस धरून जर अशाप्रकारे अत्यावश्यक सेवा अडवली जात असेल तर सरकार देखील हातावर हात ठेवून गप्प बसू शकत नाही. म्हणून सरकार सर्व पर्यायांवर विचार करतय आणि हे सर्व पर्याय वापरावे लागतील. असा इशाराही मंत्री अनिल परब यांनी दिला.

एसटीचे २२ हजार कामगार कामावर परत आलेत. त्यामुळे एसटीच्या १२५ डेपोंमध्ये छोट्या-मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. मात्र विदर्भ, मराठवाड्यात कमी प्रमाणात वाहतूक सुरु आहे. अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली.


मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष होणार, मोदी सरकार याच अधिवेशनात आणणार विधेयक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -