राज्य सरकार पुन्हा घेणार आरोग्य भरतीची ‘ही’ परीक्षा

stat government will re-examine the health department
stat government will re-examine the health department

राज्य सरकार आरोग्य भरती परीक्षा पुन्हा घेणार आहे. या परिक्षेच्या तारखा लवकरात लवकर जाही केल्या जातील, अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी याबाबत चर्चा झाल्याचे ही राजेश टोपेंनी यावेळी सांगितले. त्यामुळे दोन्ही परीक्षा आता पुन्हा होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा ड वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असून त्यांचे ही मत लक्षात घेतले आहे. दोन्ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय मंत्री मंडळाने घेतला असून नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा निर्णय देखील झाला आहे.

दरम्यान त्यंनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत माहिती दिली. कुठेही चौथी लाट असल्याचे माझे सूतोवाच नाही. सध्या रुग्ण संख्या कमी आहे. महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे,नाशिक,ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत त्या ठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाही. जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढण्याता आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.