घरताज्या घडामोडीनवे शैक्षणिक धोरण : पुढच्या वर्षी 10वी-12वीच्या बोर्डाची परीक्षा होणार का? शिक्षण...

नवे शैक्षणिक धोरण : पुढच्या वर्षी 10वी-12वीच्या बोर्डाची परीक्षा होणार का? शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण

Subscribe

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार नसल्याचा गैरसमज विविध स्तरातून पसरविला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्टिकरण दिले आहे. त्यानुसार, 'नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात लागू झाल्यानंतरही दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा होणारच आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार नसल्याचा गैरसमज विविध स्तरातून पसरविला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्टिकरण दिले आहे. त्यानुसार, ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात लागू झाल्यानंतरही दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा होणारच आहे. पुढील वर्षी देखील दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणेच होणार आहे’, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. (State Board Of Education Next Year Also The 10th 12th Board Exam Will Be Conducted)

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत शरद गोसावी यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले आहे. देशभरात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची चर्चा सुरू आहे. या धोरणातील तरतुदीनुसार दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा रद्द होणार, शालेय शिक्षणात विविध टप्प्यावर परीक्षा होणार का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. परिणामी विद्यार्थी-पालक एवढंच नव्हे तर शिक्षक-मुख्याध्यापक, शाळा प्रशासन यांचा गोंधळ उडाला असून संभ्रमावस्था आहे. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल जाहीर करताना गोसावी यांनी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत माहिती दिली.

- Advertisement -

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 10वी-12वीची बोर्डाची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “केवळ त्या परीक्षा सत्र पद्धतीने घेण्याबाबत सुचविले आहे. त्यावर राज्य सरकार जो निर्णय घेईल, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा होणारच आहेत. त्याशिवाय इयत्ता पाचवी आणि आठवीच्याही परीक्षा घेण्याबाबत धोरणात म्हटले आहे”, असे शरद गोसावी म्हणाले.


हेही वाचा – दुबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाला पक्षाची धडक, 160 प्रवासी थोडक्यात बचावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -