घरमहाराष्ट्रपुणे’वंदे भारत’ ट्रेनवर पुन्हा दगडफेक; पुण्यामध्ये घडली घटना

’वंदे भारत’ ट्रेनवर पुन्हा दगडफेक; पुण्यामध्ये घडली घटना

Subscribe

पुणे : गेल्या काही महिन्यात वंदे भारत ट्रेनवर (Vande Bharat Train) दगडफेक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच मुंबई-सोलापूर मार्गावर धावणार्‍या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये घडलेल्या घटनेत प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही तरी रेल्वे सुरक्षा दल सतर्क झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य रेल्वेवर सीएसएमटी- शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेनचे १० फेब्रुवारी २०२३ ला उद्घाटन करण्यात आले. ही वंदे भारत ट्रेन आज १४ मार्गावरुन जात आहे. या दोन्ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी तुफान प्रतिसाद दिला असला तरी या एक्सप्रेस गाडीवर दगडफेकीच्या घटना वारंवार होताना दिसत आहेत.

- Advertisement -

रविवारी (23 एप्रिल) सायंकाळी सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने पुणे स्थानक सोडल्यानंतर दगडफेकीची घटना घडली आहे. या घटनेत गाडीची काच फुटली असली तरी सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी दगडफेक करणार्‍यांचा रेल्वे पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तसेच दगडफेकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे रुळालगत गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकातामध्ये उद्घाटन झाल्यानंतर 4 दिवसांनी दगडफेक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीमध्ये पश्चिम बंगालमधील पहिल्या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले होते. त्यानंतर 4 दिवसांनीच हावड़ा ते न्यू जलपाईगुड़ी या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. कोलकातातील मालदा येथे ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत सुदैवाने कुठल्याही प्रवाशांना इजा झाली नाही. मात्र, गाडीच्या काचा फुटल्याचे दिसून आले. या फुटलेल्या काचा रेल्वे कोचमधील खुर्चीवरही पडल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना धीर दिला होता.

- Advertisement -

बेंगळुरूमधून एकाला अटक
बेंगळुरूमधील मालूर आणि टायकल दरम्यान वंदे भारत ट्रेनवर नेहमी दगडफेक होत होती. त्यासंदर्भात एका व्यक्तीस रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात पकडले. 36 वर्षीय अभिजीत अग्रवाल असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १५३ व १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मनोरुग्ण असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -