घरमहाराष्ट्रएसटीची ट्रेलरला धडक

एसटीची ट्रेलरला धडक

Subscribe

३३ प्रवासी वाचले

मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे दुष्टचक्र सुरूच असून गोव्याच्या दिशेने जाणारा टाटा सुपर टेम्पोचा चालक ट्रेलरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना एसटी आणि ट्रेलर यांच्यात जोरदार धडक झाली. यावेळी एसटीतील ३३ प्रवासी वाचले. अपघातात एसटी चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना पार्टेवाडी हद्दीत घडली.

टेम्पो चालक नितेश राजाराम कोठावळे (रा. इन्सोली, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हा टेम्पो (एमएच ०७ पी २१३६) घेऊन मुंबई ते गोवा असा जात असता कशेडी घाटात हा अपघात झाला. ट्रेलर चालक हरदेवराम बिष्णोई ( ४५ रा. जोधपूर, राजस्थान) हा आपल्याकडील ट्रेलर (आरजे १९ जीई ८०३७) घेऊन कशेडी घाटातून जात असताना त्याच दरम्यान समोरून येणारी एसटी बस (एमएच २० बीएल ३६१५) चालक धनराज चक्रभुज बिक्कड (३०, रा. दापोली) हा दापोली ते पुणे मार्गावर ३३ प्रवासी घेऊन जात होता. एसटीची ट्रेलरच्या मागील भागास धडक लागून अपघात झाला. मात्र ओव्हरटेक करणारा टेम्पो रस्त्याच्या साईडपट्टीवर चुकीच्या बाजूने उतरल्याने वाचला, मात्र या अपघातात एसटी चालक धनराज बीक्कड याच्या पायाला किरकोळ दुखापत होऊन जखमी झाला आहे. सुदैवाने एसटी बसमधून प्रवास करणारे ३३ प्रवासी सुखरूप आहेत.

- Advertisement -

या घटनेची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहा. फौजदार यशवंत बोडकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर साखरकर, जीवन जाधव, आरमान तडवी, शंकर कुंभार, अनिल पवार, पोलीस मित्र महेश रांगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जगतगुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्ण वाहिकेस बोलावले. जखमी चालक धनराज बिक्कड यास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -