घरताज्या घडामोडीSudhir Mungantiwar : तुम्ही अश्रू पाहून मतदान कराल तर..., मुनगंटीवारांचा इशारा

Sudhir Mungantiwar : तुम्ही अश्रू पाहून मतदान कराल तर…, मुनगंटीवारांचा इशारा

Subscribe

जर तुम्ही अश्रू पाहून व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर, 4 वर्ष 11 महिने 29 दिवस, 23 तास आणि 59 मिनीटं तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत महायुतीच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना इशारा दिला.

चंद्रपूर : जर तुम्ही अश्रू पाहून व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर, 4 वर्ष 11 महिने 29 दिवस, 23 तास आणि 59 मिनीटं तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत महायुतीच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना इशारा दिला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपुरात सभा झाली. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीत इतर पक्षाचे नेतेमंडळी उपस्थित होते. (sudhir mungantiwar slams mva lok sabha candidate pratibha dhanorkar at chandrapur)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर निशाणा साधला. “विकासावर कुणी मतदान केलं नाही तर, सहानभूतीवर मतदार करतील असाही मला प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, जर तुम्ही अश्रू पाहून व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर, 4 वर्ष 11 महिने 29 दिवस, 23 तास आणि 59 मिनीटं तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी तुम्हालाच तुमची सहानुभूती करावी लागेल. मला तुम्ही सावधान करण्यासाठी हा इशारा देतो आहे. राजकारणात निवडणूक ही विकासकामांवर झाली पाहिजे. नेहमी तुलना विकासाची करा, प्रगतीची करा, केलेल्या कामाची करा, मी जनतेची कामं केली”, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतीभा धानोरकरांवर निशाणा साधला.

- Advertisement -

“माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली ती विकासावरच दिली. पण तुम्ही केलेली विकासकामं, संकल्प सांगा. तुमचे 2 वर्ष 8 महिने महाराष्ट्रात सरकार होते. 55 वर्ष देशात आणि 50 वर्ष महाराष्ट्रात सरकार होते. त्यावेळी तुम्ही किती दिवे लावले हे सांगा. आम्ही पण किती दिवे लावले ते सांगू. पण सावधान राहा. हे खोटा प्रचार करणार आहेत. आज जेव्हा काँग्रेसचा नेता विचारतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय, तेव्हा भाषणात मी सांगीन. पण तुम्ही 50 वर्ष सत्तेत असताना काय झोपा घेतल्या. कुंबकरणाला पुन्ही एकदा लंकेत धाडलं तर, तो काँग्रेसच्या नेत्यांना विचारले की, रिश्ते मे ये हमारे बाप लगते है.. मैं छे महिने सोता था.. लेकीन ये तो साल भर सोते है…”, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. टीका करतील. सोशल मीडियावर बदमाशी करतील. खोटा अपप्रचार करतील. पण आपल्या संगळ्यांना उमेदवार व्हायचं आहे. मी उमेदवार नाही. तुम्ही उमेदवार आहात. मी तुमच्या विजयासाठी, तुमच्या लढाईसाठी आणि विश्वगौरव नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करत आहे. मी लोकसभेत गेलो तर, मला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाला देशातील लोकसभा मतदारसंघापैती एक उत्तम मतदारसंघ बनवायचा आहे. मी निवडून आलो तर चार फुटांनी माझी उंची चार फुटांनी वाढणार नाही. मी हरलो तर माझी उंची चार फुटांनी कमी होणार नाही. माझं वजनही अचानक निवडून आल्याने 10 किलोनी वाढणार नाही. पण मी विजयी झालो तर तुमच्या विकास, प्रगती, उन्नतीची उंची वाढवीन. या देशाची उंची ही चीन, पाकिस्तान, अमेरिका, जपानसारख्याही देशापेक्षा वाढेल, हा माझा विश्वास आहे”, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – CHANDRAPUR : आशीर्वाद द्यायला फडणवीस आले, आता विजय निश्चित – सुधीर मुनगंटीवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -