नितीन गडकरी जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवत होते, सुषमा अंधारेंचं खळबळजनक वक्तव्य

एवढंच नव्हे तर, तेव्हा नितीन गडकरींनी गोपिनाथ मुंडेना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला तर आता देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवत असल्याचं म्हटलं आहे.

warkari community aggressive against shiv sena sushma andhare

मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवत होते, असा मोठा धक्कादायक आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर, तेव्हा नितीन गडकरींनी गोपिनाथ मुंडेना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला तर आता देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवत असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या दोन्ही वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने त्या भंडारा जिल्ह्यात बोलत होते.

हेही वाचा – आज बिनधास्त फिरा, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक नाही!

नागपूर आणि बीड यांचे संघर्ष पहिल्यापासून चालत आले आहेत. नितीन गडकरी जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडवकत होते. आता देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांना अडकवत आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसंच, त्यांनी यावेळी संभाजी भिडे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. संस्कृती जपणारे भिडे गुरूजी अमृता फडणवीस यांना मंगळसूत्रावरून जाब विचारतील का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा – ‘मुंबईत कलम 144 लागू’ ही चुकीची माहिती, विश्वास नांगरे पाटलांचा खुलासा

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा भंडारा जिल्ह्यात पोहोचली आहे. यावेली त्यांना त्यांच्या मुलीचा फोटो भेट स्वरुपात देण्यात आली. मुलीचा फोटो पाहून त्यांना भर व्यासपीठावर अश्रू अनावर झाले. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्यांना आपल्या मुलीला भेटता येत नसल्याने फोटो पाहताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.