घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदंगल भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या पीएफआय’च्या संशयित मौलवीस कोठडी

दंगल भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या पीएफआय’च्या संशयित मौलवीस कोठडी

Subscribe

नाशिक : दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी (दि.13) वादग्रस्त पीएफआय’शी संबंधित सातव्या संशयितास मालेगावमधून अटक केली. इरफान दौलत खान नदवी उर्फ मौलाना इरफान खान (३५,रा.गुलशेरनगर, मालेगाव) असे या संशयिताचे नाव आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यास १४ दिवसांची एटीएस कोठडी सुनावली. दरम्यान, संशयित खान याने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या विरोधात चिथवणीखोर मेसेज व्हायरल करून धार्मिक संघर्ष निर्माण करीत यापूर्वी अटक केलेल्या सहाही संशयितांशी खान याने तब्बल ५०० वेळा मोबाईलद्वारे संभाषण केल्याचे उघडकीस आले आहे.

देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली दहशतवाद विरोधी पथकाने सप्टेंबर महिन्यात मध्ये एकाच वेळी कारवाई करीत देशभरातून पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या सदस्यांना अटक केली आहे. नाशिक विभागानेही सुरुवातीस पाच संशयित पकडले. त्यानंतर चौकशी करत अटकेत असलेल्या संशयितांचे मोबाइल फॉरमॅट मारणार्‍या डाटा पुसणार्‍या संशयितास नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. त्यानंतर सखोल चौकशी करीत विभागाने मालेगावमधून पुन्हा एका संशयितास पकडले.

- Advertisement -

मौलाना इरफान खान यास सोमवारी (दि.१४) अटक करण्यात आली. खान याने औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड या शहरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून नुपुर शर्माच्या निषेधार्थ मेसेज व्हायरल केले होते. यावेळी त्याने व्हॉट्सअ‍ॅपच्या एका ग्रुपमधून चिथावणीखोर मेसेज करीत जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. यासंदर्भात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. त्यानुसार संशयिताला येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास दहशतवादविरोधी पथकाचे सहायक आयुक्त अरुण वायकर हे करीत आहे.

संशयित इरफान दौलत खान नदवी उर्फ मौलाना इरफान खान हा प्रतिबंधित ऑल इंडिया इमाम कौन्सिल संघटनेचा अध्यक्षही आहे. मालेगावात २०१९ सालापासून तो ‘पीएफआय’ संघटनेसाठी समन्वयक म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सपच्या ग्रुपपद्वारे असुरक्षिततेची भावना पसरवून जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न तो करत होता. त्याच्यावर यापूर्वीही मालेगावात गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास दहशतवादी विरोधी पथक करत आहे.

- Advertisement -
सांकेतिक भाषेत संवाद

संशयित मौलाना इरफान खान याच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी घेतले आहे. इतर संशयितांसोबत साधलेला संवाद आक्षेपार्ह असून यामध्ये काही सांकेतिक भाषेचाही वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचप्रमाणे दहशत पसरविण्यासाठी अर्थसहाय्य कोणी व कोठून केले, परदेशांमधील संपर्क, व्हॉट्सअप ग्रुपवर भावना भडकवण्याचा कोणता हेतू होता, आदी सखोल तपास करावयाचा असल्याचे अ‍ॅड. अजय मिसर यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाला सांगितले.

५०० संशयस्पद कॉल्स

एटीएसकडून पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांसोबत खान याचा संपर्क असल्याचे समोर येत आहे. पुणे, मालेगाव, जळगावमधून अटक केलेल्या सहा संशयितांसोबत अंदाजे ५०० वेळा संवाद झाल्याचे तपासातून उघड होत आहे. इतर सभासदांसोबतही शेकडो वेळा संभाषण झाले असून, ते संवेदनशील व आक्षेपार्ह आहेत. पोलिसांनी संभाषणांच्या ध्वनिफितींची स्क्रीप्ट न्यायालयात न्यायालयात सादर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -