घरताज्या घडामोडीसंजय राऊतांविरोधातील जबाब मागे घेण्यासाठी स्वप्ना पाटकरांना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी

संजय राऊतांविरोधातील जबाब मागे घेण्यासाठी स्वप्ना पाटकरांना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी

Subscribe

धमकी मिळाल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. सोमय्या यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांचे नाव घेतले असल्याचे सांगण्यात यावे, अशी धमकी स्वप्ना पाटकर यांना मिळाल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिलेला जबाब बदलावा याकरता चित्रपट निर्माती  स्वप्ना पाटकर यांना धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊतांची ईडी चौकशी सुरू आहे. स्वप्ना पाटकर या प्रकरणात साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांनी ईडीकडे आपला जबाब नोंदवला आहे. याआधी स्वप्ना पाटकर यांची सखोल चौकशीही झाली. दरम्यान, त्यांनी आपला जबाब बदलावा याकरता त्यांना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळाल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. सोमय्या यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांचे नाव घेतले असल्याचे सांगण्यात यावे, अशी धमकी स्वप्ना पाटकर यांना मिळाल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री आपला मुक्काम दिल्लीत हलवतील असं वाटतंय, संजय राऊतांचा खोचक टोला

धमकी देणाऱ्यांकडून स्वप्ना पाटकर यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. त्यांचा मोबाईलही हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, गेल्या काही दिवसांपासून ही धमकी मिळत असून त्यांना मानसिक त्रासही दिला जात असल्याचं स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांचा मोबाईल क्रमांक सार्वजनिक ठिकाणी लिहिण्यात आला आहे. तर, घरी येणाऱ्या वृत्तपत्रातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा  – बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली, पण.., संजय राऊतांचा हल्लाबोल

काय आहे प्रकरण

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीनप्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते, मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणार्‍या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार घरांचे बांधकाम करायचे काम दिले होते. त्यापैकी ६७२ घरे येथील भाडेकरूंना द्यायची होती. उर्वरित घरे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती, परंतु २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात चौकशी सुरू असलेले सुजित पाटकर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत. स्वप्ना पाटकर या सुजित पाटकर यांच्या पत्नी होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांना घटस्फोट घेतला. तसेच, याप्रकरणी ईडी कार्यालयात स्वप्ना पाटकर यांचीही चौकशी झाली होती.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -