घरमहाराष्ट्र'Indic Tales' वेबसाइटवर कारवाई करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मुख्य सचिवांना निर्देश

‘Indic Tales’ वेबसाइटवर कारवाई करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मुख्य सचिवांना निर्देश

Subscribe

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे 'Indic Tales' या वेबसाईटवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात येत आहे. अखेरीस आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे ‘Indic Tales’ या वेबसाईटवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात येत आहे. अखेरीस आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर या प्रकरणी महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहित समता परिषद आणि इतर सामाजिक संघटनांनी कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करावी, यासाठी आज राष्ट्रवादी आणि समता परिषदेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केले.

हेही वाचा – Savitribai Phule : सावित्रीबाई फुलेंची पुन्हा बदनामी, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

- Advertisement -

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाइटवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या वेबसाईटवर जो काही आक्षेपार्ह मजकूर आहे तो तपासून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून मुख्य सचिवांना देण्यात आलेले आहेत. तसेच, महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थेने घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही. तसेच, ‘इंडिक टेल्स’ वरून लिहिण्यात आलेल्या लेखात काही आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

अशा प्रकारचं लिखाण करण्यामागे मास्टरमाइंड कोण?
अजित पवार यांनी प्रसार माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ या दोन वेबसाईटवर इतकं खालच्या पद्धतीनं लिखाण करण्यात आलंय की, मी तुम्हाला येथे सांगूही शकत नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आमच्या प्रेरणास्त्रोत आहोत. आम्ही अनेक महापुरुषांची नाव घेत असतो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीने काम करावं. असं आमचं सातत्यानं म्हणणं असतं. त्यासाठी आम्ही सीपींसोबत बोललो आणि त्यांनी या प्रकरणाची दखलही घेतली. अशा प्रकारचं लिखाण करण्यामागे मास्टरमाइंड कोण?, हे लिखाण करण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं. हे शोधून काढण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, महापुरुषांचा अपमान बहुतेक ठिकाणी राज्यकर्त्यांकडूनच केला जातोय. कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे. राजकीय हस्तक्षेप होऊ न देणं हे त्यांचं काम आहे. पूर्वींच्या राज्यपालांनी ही सुरूवात केली. त्यानंतर आताच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यामध्ये भर घातली. तसेच सत्तेत असणाऱ्या प्रवक्त्यांनी देखील त्यामध्ये भर घातली. हे जे काही सुरूयं. त्याविरोधीत मविआनं मोर्चा देखील काढला होता. बेरोजगारीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नाला महत्त्व देण्याऐवजी हे प्रश्न पुढे आले. त्यामुळे महापुरुषांबद्दल कुणीही आणि वाचाळविरांनी बोलू नये. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शासन झालं पाहिजे, असं मत अजित पवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -