घरमहाराष्ट्रसचिन वाझे अनेकांची नावं घेतील म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालतंय - देवेंद्र...

सचिन वाझे अनेकांची नावं घेतील म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालतंय – देवेंद्र फडणवीस

Subscribe

सचिन वाझे यांच्या विरोधात पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपने सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. सचिन वाझे यांच्या विरोधात पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सचिन वाझे अनेकांची नाव घेतील म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत ते नेमके कोणाला वाच होत आहेत असा सवाल देखील फडणवीस यांनी केला आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणा वरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. सचिन वाझेंवरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सभागृहात मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. मनसुख यांची गाडी सचिन वाझे हे वापरत होते हे सांगितलं. सचिन वाझे आणि मनसुख सोबत असायचे हे देखील त्या बोलल्या आहेत. माझ्या पतीचा खून सचिन वाझे यांनी केला आहे असं त्या जबाबात आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे की सचिन वाझे यांना मागे घातलं जातंय. हे प्रकरण स्पॉन्सर होतं का? सचिन वाझेला बाजूला केलं तर इतरांची नावं येतील याला सरकार घाबरत आहे, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

सचिन वाझेला वाचवण्यासाठी सरकार डेलकर, अन्वय नाईक प्रकरण मध्ये आणतंय. अन्वय नाईक प्रकरणात माझी चौकशी करावी. मात्र अन्वय नाईक यांच्याकडून कोणी जमीन खरेदी केली याची देखील चौकशी करावी, असं माझं खुलं आव्हान आहे. मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत, ते नेमके कोणाला पाठीशी घालत आहेत, असा सवाल फडणवीस यांनी केला. खरं काय शिजलंय ते बाहेर येऊ नये यासाठी कारवाई केली जात नाही आहे हे स्पष्ट आहे, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा- विधानसभा अध्यपदाची निवड याच अधिवेशनात व्हावी – नाना पटोले

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -