घरताज्या घडामोडी'महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय', संजय राऊतांचे विधान

‘महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय’, संजय राऊतांचे विधान

Subscribe

महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे, कारण आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरेंचा हात धरुन आले होते. प्रबोधनकारांच्या सांगण्यावरुच ते या आंदोलनात सहभागी झाले होते, असे विधान संजय राऊत यांनी केले.

महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे, कारण आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरेंचा हात धरुन आले होते. प्रबोधनकारांच्या सांगण्यावरुच ते या आंदोलनात सहभागी झाले होते, असे विधान संजय राऊत यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चैत्यभूमी येथे आले होते. त्यावेळी राऊतांनी हे विधान केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्यासह अनेक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे, कारण आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरेंचा हात धरुन आले होते. प्रबोधनकारांच्या सांगण्यावरुच ते या आंदोलनात सहभागी झाले होते. म्हणून आम्हाला आज त्यांचं स्मरण होत आहे”.

- Advertisement -

याशिवाय, “बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे दोघे या महाराष्ट्राची दैवतं आहेत. ते आमच्या मनात आहेत. आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जो महासागर उसळला आहे, त्यातील आम्ही एक आहोत. आम्हाला फक्त आजच त्यांचं स्मरण होत आहे असं नाही. जेव्हा जेव्हा या देशात कायदा आणि घटनेची पायमल्ली होते, सामान्यांवर अत्याचार होतात तेव्हा तेव्हा आम्हाला बाबासाहेबांची घटना आणि कार्य सतत आठवत असतं. आज आम्हाला आंबेडकरांची प्रकर्षाने आठवण होत आहे. कारण देशातील प्रत्येक क्षेत्रात घटनेची पायमल्ली सुरु आहे. न्यायव्यवस्था. प्रशासकीय व्यवस्था, राजकारण या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान होताना दिसत आहे. म्हणून आज आम्हाला आंबेडकर आठवत आहेत”, असेही असं संजय राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा – अरेच्चा! खुद्द एकनाथ शिंदेच म्हणतात, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -