Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अरेच्चा! खुद्द एकनाथ शिंदेच म्हणतात, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

अरेच्चा! खुद्द एकनाथ शिंदेच म्हणतात, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

Subscribe

मुंबई – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कमोर्तब करण्यात आलं होतं. मात्र, आयत्यावेळेला शिंदे गटातील आमदार एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर झालं आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, शिंदे-फडणवीस सराकरमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरीही राज्याचं स्टेअरिंग देवेंद्र फडणवीसांच्याच हातात असल्याची चर्चा  राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असल्याचं अनावधानाने म्हटलं आहे.

हेही वाचा – तेलही गेले, तूपही गेले; शिंदे गटाला मंत्रिमंडळाबरोबर महामंडळातही कमी वाटा?

- Advertisement -

स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घटानासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. यावेळी दोघांनीही उपस्थित जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर आपल्या भाषणाची सुरुवातच सुमधूर कोकणी भाषेतून केली. कोकणी भाषेतून बोलताना आपण चुकलो तर नाही ना याचीही खातरजमा करून घेतली. मात्र, आपल्या भाषणाला पुढे सुरुवात करताना आणि उपस्थितांचे आभार मानताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला आहे. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा – मंत्र्यांनी केला बेळगाव दौरा रद्द, पवारांच्या आंदोलनाचा दाखला देत सुप्रिया सुळेंचा चिमटा

- Advertisement -

‘स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राज्याचे लाडके मुख्यमंत्री लोकप्रिय देवेंद्र फडणवीसजी’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार असला तरीही देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचं नियंत्रण होतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्याने राज्यातील कुजबुजीवर शिंदेंनी शिक्कामोर्तब केलंय की काय अशी चर्चा आता नव्याने रंगू लागली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -