घरमहाराष्ट्रकल्याणमध्ये आरोपीनं थेट पोलीसाला उडवलं

कल्याणमध्ये आरोपीनं थेट पोलीसाला उडवलं

Subscribe

कल्याणमध्ये शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर आरोपींनी थेट गाडी चढवली. या घडलेल्या घटनेमध्ये जखमी झालेल्या पोलीसाचे नाव अमोल गोरे असे असून ते डीसीपी स्कॉडमध्ये कार्यरत होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

अशी घडली घटना

कल्याण पश्चिमेतील संतोषी माता परिसरात बँकेवर दरोडा टाकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती कल्याण पोलिसांच्या डीसीपी स्कॉडला मिळाली होती. त्यानूसार या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महिंद्रा टियूव्ही गाडीतून संशयित आरोपी संतोषी माता रोडवरील एचडीएफसी बँकेजवळ पोहोचले.

त्यावेळी डीसीपी स्कॉडमधील अमोल गोरे हे संशयित आरोपींची गाडी थांबवण्यासाठी त्यांच्यासमोर येऊन उभे ठाकले. मात्र आरोपींनी गाडी थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने थेट गोरे यांच्या अंगावर घातली आणि तिथून पळ काढला. ही गाडी अक्षरशः गोरे यांच्या अंगावरून नेण्यात आल्याने अमोल गोरे जबर जखमी झाले.

- Advertisement -

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर डीसीपी स्कॉडमधील इतर सहकाऱ्यांनी गोरे यांना तातडीने खासगी रुग्णालायत दाखल केले. या घटनेत गोरे यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून पोलीस संबंधित आरोपींचा कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -