केंद्रातील हुकूमशाहीला लोकशाही मार्गानेच उत्तर देणार; नाना पटोलेंचा इशारा

काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हे हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी दिला.

nana patole allegation over bjp ED action against Satish Uke for suppressing voice against BJP

केंद्रातील भाजपचे सरकार मनमानी आणि अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हे हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी दिला. (The dictatorship by the center government will be answered in a democratic way; Nana Patole’s warning)

हेही वाचा – ‘विधान परिषदेसाठी मतदान करायचं असेल तर नवी याचिका दाखल करा’

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीची नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटिशीच्या विरोधात नाना पटोले (Nana Patole), विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या नेतृत्त्वाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला.

हेही वाचा – विधानपरिषदेत मविआचे ६ उमेदवारही निवडून येतील – बाळासाहेब थोरात

यावेळी बोलताना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. गांधी कुटुंबाने देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याग केला, बलिदान दिले. त्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी खोट्या आणि बनावट प्रकरणात त्यांना अडकवण्याचा भाजप सरकारचा कुटील डाव आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचा आवाज दडपण्याचा भाजप सरकार प्रयत्न करत आहे. पण अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भिक घालत नाही. जनता सरकारनेही इंदिरा गांधी यांच्याविरोधात अशीच कारवाई केली होती. आता भाजप सरकार तेच करत आहे. पण अहंकारी, अत्याचारी भाजप सरकारसमोर काँग्रेस कदापी झुकणार नाही, असे पटोले म्हणाले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार कुणाल पाटील, अमर राजूरकर, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दिकी, संग्राम थोपटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – इम्पिरिकल डेटा गोळा करताना सरकारकडून चूक, ओबीसी आरक्षणावर मोठा परिणाम होणार; फडणवीसांचा इशारा

दरम्यान, कॉंग्रेसने आज नागपुरातही ईडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा धिक्कार केला. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, आमदार विकास ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील देशमुख, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक आदी उपस्थित होते.