घरमहाराष्ट्रखुद्द राज्यपालही सरकार स्थापनेच्या प्रतिक्षेत

खुद्द राज्यपालही सरकार स्थापनेच्या प्रतिक्षेत

Subscribe

मै किसान के आँसू पोछना चाहता हूँ

मै किसान का बेटा हूँ। किसान दुःख में है, मै यहाँ चैन से कैसे बैठ सकता हूँ ? किसान संकटमे है, आप जल्दही सरकार बनाए. मै किसानके पास जाकर उनके आसू पोंछना चाहता हूँ. अशा शब्दात आपल्या मनातल्या भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकत्याच एका केंद्रीय मंत्र्याजवळ व्यक्त केल्या.राज्यातील शेतकर्‍यांवर कोसळलेले अवकाळी पावसाच्या संकटाने झालेले नुकसान हे खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याही जिव्हार्‍ही लागले आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची प्रतिक्षा राज्यपालांनाही आहे. त्यामुळेच सत्ता लवकर स्थापन झाल्यास राज्यातील पीक नुकसानग्रस्त भागाचा दौर करण्यासाठी राज्यपाल इच्छुक आहेत. राज्यात सत्ता स्थापनेसाठीचे नाट्य दिवसेंदिवस लांबणीवर पडत असल्यानेच राज्यपालांचा दौराही गेल्या काही दिवसांपासून लांबणीवर पडला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री तसेच आरपीआय (आठवले) गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राज्यपालांनी आपली शेतकर्‍यांशी असलेली भावना बोलून दाखवली आहे. आता सरकार स्थापनेच्या घडामोडी घडत असल्यानेच राज्यपाल मुंबईत अडकून पडले आहेत. पण राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी समारंभ संपल्यानंतर राज्यपाल राज्यातील पीक नुकसानग्रस्त भागातील दौर्‍यावर जाणार आहेत.

राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक भागात शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यपाल वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांवर कोसळलेल्या संकटावर लक्ष ठेवून आहेत. महत्वाचे म्हणजे स्थानिक भाषांमधील वृत्तपत्रे वाचवण्यावर त्यांचा भर आहे. त्यासोबतच शासकीय यंत्रणेकडूनही राज्यपाल दररोज या सगळ्या परिस्थितीला आढावा घेत आहेत. राज्यपालांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून राज्यात अलीकडेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकहानीबद्दल अवगत केले. त्यावेळी अमित शहा यांनी राज्यपालांना महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -