घरमहाराष्ट्रनागपूरDevendra Fadnavis : पुढचा एक-दीड महिना देश अन् मोदींसाठी द्यायचाय; फडणवीसांचे आवाहन

Devendra Fadnavis : पुढचा एक-दीड महिना देश अन् मोदींसाठी द्यायचाय; फडणवीसांचे आवाहन

Subscribe

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकांची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठकाही होताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपाने नागपूर येथे आयोजित भारतीय जनता युवा मोर्चा आणि नमो युवा महासंमेलनात पुढचा एक-दीड महिना देशाकरता अन् मोदींकरता द्यायचा आहे, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना केले आहे. (The next one and half months should be given to the country and Modi Devendra Fadnavis appeal)

हेही वाचा – ISRO : आदित्य-L1 प्रक्षेपणाच्या दिवशीच कर्करोगाचे निदान; सोमनाथ यांनी व्यक्त केल्या भावना

- Advertisement -

नागपूर येथील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूरमध्ये विदर्भातली आणि महाराष्ट्रातली युवाशक्ती पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना देशाचे प्रधानमंत्री बनवण्याकरता संकल्प घ्यायला याठिकाणी एकत्रित आली आहेत. “अबकी बार” हा संकल्प आमचे युवा नागपूरच्या भूमीतून आज घेणार आहेत. गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं आहे. त्यामुळे मोदींना 400 पेक्षा जास्त जागा का द्यायच्या? पुन्हा नमो सरकार का आणायचं? याची अनेक कारणे आहेत. पण 2047 साली विकसित भारताचं एक स्वप्न घेऊन आता मोदी निघालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना मोदींना साथ द्यायची आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

हेही वाचा – Asim Sarode : ‘तुला काय स्वप्न पडलं का?’…लैंगिक अत्याचाराच्या सरोदेंच्या आरोपांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणालेकी, 2024 ची निवडणूक ही भाजपाच्या विजयाकरता नाही तर भारताच्या विजयाकरता आहे. पुन्हा एकदा मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले तर एक गोष्ट लक्षात ठेवा मग भारताला कुठेही मागे वळून पाहावं लागणार नाही. पुढच्या पाच वर्षात भारत अशा प्रकारे मजबूत बनेल की मग भारताकडे कोणी देखील डोळे वर करून पाहू शकणार नाही. या भारताशी कोणी स्पर्धा करू शकणार नाही. भारताला बलशाली घडवण्याची संधी ही तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की, आता पुढचा एक-दीड महिना केवळ देशाकरता, मोदींकरता आणि बलशाली भारताकरता द्या, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -