घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या स्वाभिमानी परंपरेला शिंदे-फडणवीस सरकारने मातीमोल केले, बेळगाव रद्द दौऱ्यावर राष्ट्रवादीचा संताप

महाराष्ट्राच्या स्वाभिमानी परंपरेला शिंदे-फडणवीस सरकारने मातीमोल केले, बेळगाव रद्द दौऱ्यावर राष्ट्रवादीचा संताप

Subscribe

मुंबई – महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील उद्या कर्नाटक दौऱ्यावर जाणार होते. मात्र, दोन्ही राज्यातील सीमावाद उफाळला असल्याने कायदा सुव्यवस्थेचे कारण देत हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आलाय. मात्र, यावरून राज्यात आता कलगीतुरा रंगला आहे. हा दौरा रद्द करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी आणि गौरवशाली परंपरेला शिंदे फडवणीस सरकारने माती मोल करण्याचे पाप केले, असा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हे ट्विट केले आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : आमचा बेळगाव दौरा निश्चित पण…, मंत्री शंभुराज देसाईंचे स्पष्टीकरण

- Advertisement -

दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र आजवर झुकलेला नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता ही दिल्लीलाही भूरळ पाडते. मात्र राज्याच्या विद्यमान सरकारने कर्नाटक दौरा रद्द करून या स्वाभिमानाला तडा लावून राज्यातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर सारवासारव करताना म्हणाले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने हा एका कार्यक्रमाचा दौरा होता. या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून हा दौरा रद्द केला. जर हा दौरा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याचे स्वागत करायला हवे होते, त्यांनी थेट महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका, असा संदेश का दिला हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे या संपूर्ण घटनेतून हा दौरा रद्द करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी, गौरवशाली परंपरेला मातीमोल करण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केलं आहे, असा आरोप राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई मंगळवारी कर्नाटकात जाणार होते. मात्र, ऐनवेळी हा दौरा तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परंतु, आमचा बेळगाव दौरा अद्याप निश्चित असून, आम्ही महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात जाणार असल्याची माहिती मंत्री मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

हेही वाचा – ‘आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे आम्ही…’, शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -