घरCORONA UPDATEसोसायटीतच सुरू केली दारूविक्री; रहिवाशांची पोलिसात धाव

सोसायटीतच सुरू केली दारूविक्री; रहिवाशांची पोलिसात धाव

Subscribe

सध्याच्या कोरोना व लॉकडाऊनच्या काळात अनेक कामधंदे बंद आहेत. त्यात दारूची विक्री करणाऱ्यांचाही समावेश आहे. पण पुण्यातील कात्रज येथील अंबेगाव खुर्दमधील हनुमान नगर येथे पूजा रेसीडेन्सी या इमारतीत एका महाभागाने चक्क दारु विक्रीचाच धंदा सुरू केला आहे. रोज येथे अनेक तळीराम दारु खरेदीसाठी येत असल्याने रहीवाशांना मनस्ताप होत आहे. तरी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी विनंती येथील रहीवाशांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याला दिलेल्या तक्रारीत केली आहे.

सोसायटीमध्ये दारूविक्री, रहिवासी त्रस्त!

पुण्यातील अंबेगाव खुर्दमधील एका सोसायटीच्या इमारतीत चक्क दारूविक्री सुरू

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, July 29, 2020

- Advertisement -

यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे रहीवाशांचे लक्ष लागून राहीले आहे. ज्या व्यक्तीने इमारतीत दारुविक्रीचा व्यवसाय़ सुरू केला त्याचे नाव मनोज कुंभार असे आहे. याच विषयावरून संबंधित व्यक्तीबरोबर रहीवाशांचे अनेकवेळा खटकेही उडाले. त्याची तक्रार केल्यास तो इतरांना इजा करू शकतो अशी भीतीही रहीवाशांनी तक्रारीत व्यक्त केली आहे.

हेही वाचा – SCC Result : दहावीच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १८ टक्क्यांनी वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -